#औरंगजेब मुघल
Explore tagged Tumblr posts
loksutra · 3 years ago
Text
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
रवीना टंडन अकबरुद्दीन ओवेसी (फाइल फोटो) अभिनेत्री म्हणाली, ‘देशातील प्रत्येकाला त्याने कोणाची पूजा करावी, कोणाची करू नये याचे स्वातंत्र्य आहे. जर प्रत्येकाला हा अधिकार मिळाला असेल तर ते करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. कारण आपण सहनशील लोक आहोत. AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसी (अकबरुद्दीन ओवेसी AIMIM) गुरुवारी महाराष्ट्रातील औरंगाबाद दौऱ्यावर होते. आपल्याच पक्षाचे इम्तियाज जलील आणि वारिस पठाण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – १४
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d....
पेशवा बाळाजी विश्वनाथ :  (इ.स. १६६० ते २ एप्रिल १७२०)    
महादजी विसाजी बल्लाळ देशमुख (भट) (बाळाजींचे पणजोबा) यांच्याकडे दंडराजपूरी आणि श्रीवर्धनची देशमुखी वंशपरंपरेने आलेली होती. महादजींना नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजीस कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी असे तीन मुले होती. विश्वनाथला पाच मुले होती – बाळाजी, कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.    
कोकणातील श्रीवर्धन येथे सन १६६० मध्ये बाळाजीचा जन्म झाला. पणजोबा – आजोबाप्रमाणे त्यांचे वडील विश्वनाथपंत (विसाजी) भट हे सिद्दीच्या राजवटीत देशमुख होते. त्याकाळी समुद्रावर सिद्दीचीच पकड होती. सन १६५४ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी जाणले की स्वराज्याच्या सुरक्षेसाठी समुद्रावर वर्चस्व असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी मराठा आरमार यंत्रणा उभी केली. आरमार प्रमुख दर्यासारंग यांच्यासोबत दौलतखान, इब्राहिमखान, मायनाक भंडारी आदी आधिकारी नेमले. मालवणचा सिंधूदुर्ग किल्ला, कल्याणजवळचा दुर्गाडी किल्ला उभारून आरमार बळकट केले. १६५९ मध्ये तुकोजी संकपाळ (आंग्रे – पुण्याजवळील आंगरवाडीचे मूळ असल्यामुळे आंग्रे हे आडनाव लागले) शिवाजी महाराजांसोबत  ज��डले गेले. १६५९ ते १६८० पर्यंत मराठा आरमाराचे काम त्यांनी केले. १६८० मध्ये तुकोजींच्या म��त्यूनंतर त्यांचे चिरंजीव कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ – ४ जुलै १७२९) यांनी आरमाराची धुरा सांभाळली आणि समुद्रावर प्रचंड वर्चस्व निर्माण केले. संभाजीराजांनी कान्होजीच्या साथीने मराठा आरमार खूप वाढवले होते.  
राजाराम महाराजांच्या शेवटच्या काळात सन १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना सरखेल (आरमार प्रमुख) हा सर्वोच्च किताब देण्यात आला. राजारामाच्या मृत्यूनंतर राणी ताराबाईंच्या विश्वस्तांपैकी ते एक होते. त्यांनी मुघल, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांवर चांगलाच जरब बसवला. स्वराज्यासाठी समुद्र मार्गे येणार्‍या व्यापार्‍यांकडून सारा वसूली केली.
सन १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्दीने उचल खाल्ली आणि त्याने समुद्र किनार्‍यावरच्या रयतेचा अतोनात छळ सुरू केला. भट घराणे आंग्रेला मिळाले असा समज करुन त्याने त्यांचाही छळ सुरू केला. बाळाजीचे भाऊ जानोजी यांचा त्याने वध केला. त्यामुळे परंपरागत देशमुखी सोडून बाळाजी भट कुटूंब आणि हरी महादेव, बाळाजी महादेव (नाना फडणवीस यांचे आजोबा) व रामजी महादेव हे भानु कुटूंब, श्रीवर्धन सोडून सातार्‍यास आले. सिद्दीने त्यांचा तिथेही पिच्छा सोडला नाही. सातार्‍याहुन निघून त्यांनी मुरुडला वैशयंपान कुटूंबाकडे काही दिवस आश्रय घेतला.
१६९४ ते १६९९ या काळात बाळाजी रामचंद्रपंतांकडे कारकून म्हणून काम करत होते. त्यांची हुशारी पाहून धनाजी जाधवने त्यांना दिवाण म्हणून आपल्या सेवेत घेतले. १६९९ पासून पुणे, नगर, दौलताबाद या प्रदेशावर त्यांची सरसुभेदार म्हणून नेमणुक झाली. त्यावेळी पुण्याजवळील सासवड येथे बाळाजींचे वास्तव्य होते. खुद्द औरंगजेब यावेळी स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. पुणे, नगर, दौलताबाद या परगण्यावर तर मुघलांचाच अमल होता. पण बुद्धी कौशल्याच्या जोरावर बाळाजी विश्वनाथनी मुघलांचा कहर माजू दिला नाही. बादशहाचा विश्वासही त्यांनी संपादन केला होता. त्या अनुशंगानेच त्यांनी येसूबाई अन शाहूमहाराजांची कैदेत असतांना भेट घेतली होती. पण केवळ शिष्टाईनेच नव्हे तर पुणे प्रांताच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांवर सशस्त्र आक्रमण करूनही धाक बसवला होता. वेळ पडेल तेव्हा शस्त्र चालवण्याचे कसब असल्यामुळे बाळाजींचे मराठेशाहीत नाव झाले होते.
सन १७०७ मध्ये शाहू महाराजांच्या सुटकेसाठी अनेक सरदारांप्रमाणे बाळाजींची शिष्टाई कामाला आली होती. अनेक वेळा त्यांनी बादशहा��ा शाहूच्या सुटकेसाठी अर्जवे केली होती. शाहूच्या सुटकेनंतर ताराबाई सोबत संघर्ष, मराठ्यांच्या दोन गाद्या, पेशवेपद याबाबत वर उल्लेख आलेलाच आहे.      
पेशवे पद प्राप्त झाल्यानंतर लगेचच सन १७१४ मध्ये कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांकडे वळवून पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांचा पक्ष मजबूत केला. मुघल, सिद्दी आणि दोन राजघराणे यांच्यात संघर्ष चालू असतांनाच पन्हाळ्यावर ताराबाई बंदी झाल्या आणि मराठा इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली. हा उल्लेख वरती आलाच आहे.
सन १७१४ मध्ये सुपे आणि पाटस परगण्याचे जहागीरदार, ताराबाईंचे अतिशय विश्वासू असे दमाजी थोरात यांच्यावर बाळाजींनी मोहिम काढली. दमाजीचा पाडाव केल्याशिवाय कोल्हापूरचे वर्चस्व कमी होणार नव्हते. पण दमाजी मोठ्या ताकदीने प्रत्येक हल्ला परतवून लावत होते. शेवटी सन १७१८ मध्ये शाहूराजांनी मुघलांचे सहकार्य घेवून बाळाजींना थोरातांचा पाडाव करण्याची आज्ञा केली. एवढ्या मोठ्या सैन्यासमोर दमाजीची ताकद कमी पडली. त्यांना कैद करून परळीच्या किल्ल्यावर ठेवण्यात आले.  
 या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांमध्ये सतत संघर्ष घडत होते. दोन्ही पक्ष एकमेकांना वरचढ ठरत होते. याच सुमारास हुसेन सय्यद अली याची बादशहाने दक्षिण सुभ्यावर नेमणुक केली होती. सन १७१८ साली शाहू महाराजांनी त्याच्या मार्फत बादशहाशी वाटाघाटी केल्या. या तहा अंतर्गत छ. शिवाजीच्या काळातील गडकिल्ले मराठ्यांना सुपूर्द करावेत, मराठ्यांनी जिंकलेले खानदेश, वर्‍हाड, हैदराबाद, कर्नाटक इ. भाग मुघलांनी मराठ्यांच्या ताब्यात द्यावेत, मुघलांच्या दक्षिण मुलुखात चौथाई मराठ्यांनी वसूल करावी व त्या बदल्यात बादशहाच्या मदतीस मराठ्यांनी पंधरा हजार फौज तैनात ठेवावी, कोल्हापूरच्या संभाजीस उपद्रव करू नये, दरसाल बादशहाला शाहूने दहा लाखाची खंडणी द्यावी आणि शाहूच्या मातुश्री येसूबाई, कुटुंब, संभाजीराजांचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे लोकांस बादशहाने मुक्त करावे. शाहूच्या वतीने बाळाजींनी या वाटाघाटी शिक्कामोर्तब करुन घेतल्या. हुसेन अलीने त्या मान्य केल्या पण बादशहाचे फर्मान आले नव्हते.
या वाटाघाटींमुळे शाहू महाराजांची जनसामान्यात व सरदार मंडळीत वजन वाढले. मराठ्यांना आपसातील वाद, तंटे यातून बाहेर काढण्याचा बाळाजीचा मतलब सिद्धीस गेला. मराठ्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. या तहाच्या माध्यामातून शाहूने बादशहाची एकप्रकारे ताबेदारीच स्विकारली होती. पण चौथाई, देशमुखी यामुळे मराठ्यांना एक दिशा मिळाली. कराराची अंमलबजावणी बादशहा करत नव्हत��� म्हणून स्वत: हुसेन अली आपल्याबरोबर मराठ्यांची फौज घेवून नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस निघाला. बाळाजी विश्वनाथ, त्यांचा पुत्र बाजीराव, चिमाजी आप्पा, भानू फडणीस, संताजी व राणूजी भोसले यांच्यासोबत मराठ्यांची दहा हजारांची फौज होती. फेब्रुवारी १७१९ ला फौजा दिल्लीत पोहोचल्या. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी हुसेन अली आणि बादशहात बेबनाव होवून बादशहास कैद केले गेले आणि रफीउद्दराजत यास तख्तावर बसवले गेले. बाळाजींनी यात तटस्थ भूमिका वठवली. त्यामुळे बादशहाकडून सनदा घेऊन परत येतांना त्यांना कुणाचा विरोध झाला नाही.
ठरल्याप्रमाणे कराराची अंमलबजावणी झाली. येसूबाई, मदनसिंग व इतर कुटूंबातील मंडळी यांना बाळाजींच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व सनदा घेवून २० मार्च १७१९ रोजी बाळाजींनी दिल्ली सोडले. वाटेत काशीयात्रा करून ४ जुलै १७१९ रोजी मातु:श्री येसुबाईंसह ते सातार्‍यास आले. येसुबाई २९ वर्षानंतर स्वराज्यात परतल्या. शाहूमहाराज आणि समस्त रयतेला यामुळे खूपच आनंद झाला. या बातमीने कोल्हापूरच्या संभाजीराजांनाही आनंद झाला. त्यांनी शाहूमहाराजांना पत्र लिहून हा आनंद व्यक्त केला. दोन्ही बंधूंचा कौटुंबिक जिव्हाळा यात दिसून आला, पण राजकीय वैर संपले नव्हते.  
बाळाजींची दिल्ली स्वारी सफळ झाली. स्वराज्य, चौथाई, देशमुखीच्या बादशाही सनदा प्राप्त झाल्यामुळे मराठे सरदारास आनंद झाला. या सनदांमुळे स्वराज्यावर शाहूचा हक्क सिद्ध झाला अन कोल्हापूरच्या संभाजीचा त्यावर कसलाच हक्क राहिला नाही. या स्वारीचा खर्च हुसेन अलीनेच केला होता. बाळाजींनी त्यात बचत करून प्रचंड खजीना स्वराज्यात आणला होता हेही या दिल्ली स्वारीचे एक वैशिष्ट्य ठरले अन शाहूला कृतार्थ वाटले.  
शाहूंच्या आदेशाने बाळाजी विश्वनाथांनी कराराची अंमलबजावणी सुरू केली. शिवाजीराजांच्या काळात १६७४ मध्ये जेवढे मराठ्यांचे राज्य होते तेवढे शाहूराजांकडे कायम झाले. हुसेनअली सोबत वाटाघाटी करून बादशहा कडून बाळाजींनी सनदा मिळवल्या नसत्या तर संभाजीचे पारडे जड झाले असते. पण बाळाजी दिल्लीहून यशस्वी होवून परल्यामुळे शाहूची परिस्थिती एकदम बदलली. विरोधकांची तोंडे बंद झाली. याचा फायदा बाळाजींनी घेतला. पुणे प्रांतावरील मुघलांचा अंमल कायमचा उठला. ऑगस्ट १७१९ मध्ये कल्याण भिवंडी प्रांत ताब्यात घेण्यात यश आले.
याबरोबरच बाळाजींनी वसूलीची पद्धत ठरवून दिली. सर्व विखूरलेल्या सरदारांना आपसातील तंट्या बखेड्यातून बाहेर काढून मराठेशाहीत गोवून घेतले. सरंजामी पद्धत आमलात आणली अन राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवली.  
नोव्हेंबर १७१९ मध्ये बाळाजींनी वडगाव, अष्टे वगैरे ठाणी हस्तगत करण्यासाठी मोहीम काढली. कोल्हापूरपर्यंत त्यांनी मुसंडी मारली. ���० मार्च १७२० रोजी खुद्द संभाजीमहाराज व बाळाजी विश्वनाथ यांच्या फौजा एकमेकांना भिडल्या. यात बाळाजींची सरशी होवून संभाजीमहाराजांना माघार घेवून पन्हाळ्याला परतावे लागले.
या मोहीमेवरून परतल्यावर बाळाजी सातार्‍याहून सासवडला स्वगृही आले. सततची धावपळ, दगदग यामुळे ते अचानक आजारी पडले. काही दिवस आराम करायचा सल्ला राजवैद्यांनी दिला. अनेक उपचार झाले पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या आजाराचे निमित्त झाले अन २ एप्रिल १७२० रोजी एकाएकीच त्यांना मृत्यूने कवटाळले. अतिशय करारी, बुद्धीमान, लढवैय्या अन मुत्सद्देगीरीत निष्णात असलेले प्रथम पेशवा बाळाजी विश्वनाथ अनंतात विलीन झाले.
बाळाजी विश्वनाथ हे केवळ सहा वर्ष पेशवा होते, पण एवढ्या कमी काळात त्यांनी स्वराज्य संकटमुक्त करून शाहूमहाराजांचे सिंहासन बळकट केले आणि मराठ्यांच्या वैभवाचा पाया घातला. या त्यांच्या महान कार्यामुळेच स्वराज्याला बळकटी आली होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने स्वराज्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
आता पुढचा पेशवा कोण? हा शाहू���ाजांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.  
–-----------------------–--------------------------
 पेशवा बाळाजी विश्वनाथ वंश :
पत्नी :
राधाबाई : (दादाजी बर्वे डुबरेकर, नेवारे - रत्नागिरी यांची कन्या),
मुले : (दोन मुले, दोन मुली)
१.      विसाजी उर्फ बाजीराव : (जन्म १८ ऑगस्ट १७००, डुबेरे - सिन्नर येथे)
२.      भिऊबाई :
३.      अंताजी उर्फ चिमाजी आप्पा : (जन्म सन १७०७)
४.      अनुबाई :
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले. दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते. झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती,....👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – १२
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
शाहू महाराज : (१६ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९)  
छ. संभाजीराजे आणि महाराणी येसूबाईच्या पोटी १६ मे १६८२ रोजी शिवाजी (शाहू) चा जन्म झाला. औरंगजेबाने मराठेशाहीत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती असा तो काळ. त्याच्या शहाला काटशह देत संभाजीराजांनी नऊ वर्ष स्वराज्य टिकवल��� पण दुर्दैवाने क्रुर औरंगजेबाने छळ करुन ११ मार्च १६८९ रोजी तुळापूरला त्यांचा वध केला. ६ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मुघलांच्या ताब्यात गेले आणि राणी येसूबाई व शाहू यांना कैद करण्यात आले.
बादशहाने संभाजीराजांना आतोनात छळ करुन मारले असले तरी त्याने येसूबाई आणि शाहूला मात्र सन्मान दिला. राजकैद्याची वागणुक दिली. जिथे जिथे तो जाई तिथे आपल्या छावणी शेजारीच त्यांना कैदेत ठेवले जाई. यात त्याचा धूर्तपणा होता. त्याला मराठ्यांचा गनीमी कावा चांगलाच माहित होता. मराठे कधीही छावणीत घुसून राजबंद्यांना सोडवतील ही त्याला भीती असल्यामुळे त्याने १६८९ ��ासून त्याच्या मृत्यूपर्यंत १७०७ पर्यंत हीच नीती अवलंबिली होती. अवघा सात वर्षाचा शाहू बादशहाचा आणि त्याची मुलगी झिनतुन्निसा बेगम हिचाही लाडका झाला होता. यामुळे शाहूला व येसूबाईंना कैदेत कसलाच त्रास झाला नाही.
३ मार्च १७०० रोजी छ. राजाराम महाराजांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी कळल्यावर शाहूने रामचंद्रपंतास पत्र लिहून योग्य रितीने कारभार चालवण्याची कळकळ व्यक्त केली होती. ताराबाईचा पूत्र शिवाजीचे मंचकारोहन झाल्यावरही त्याने पंतांना पत्र लिहून स्वराज्यासाठी त्यांना योग्य साथ देण्यासाठी विनवले. सन १७०० ते १७०७ पर्यंत ताराबाईच्या कुशल नेतृत्वाने स्वराज्य टिकवले. दरम्यान शाहूच्या सुटकेसाठी रामचंद्रपंत प्रयत्न करत होते. पण त्याला यश येत नव्हते. बाळाजी विश्वनाथ हे सरसुभेदार व कारकून म्हणून पुणे प्रांतावर रामचंद्रपंतांच्या हाताखाली १६९९ पासून काम करत होते. तेही सातत्याने शाहूला सोडवण्यासाठी मुघलांशी संपर्कात होते.
१७०३ च्या सुमारास बादशहा पुण्यात आला होता. शाहू यावेळी वीस वर्षाचा होता. मराठे सरदार शाहूला पळवून नेतील या भीतीने बादशहाने त्याला आपल्यासोबतच ठेवले होते. झीनतुन्निसा बेगमने त्याचे लग्न लावून द्यावे असे बादशहास सुचवले. पण शाहूला मुसलमान करुन कायम आपल्या चाकरीत ठेवावे असे बादशहाच्या मनात होते. झीनतुन्निसा बेगमने मध्यस्थी करुन यातून मार्ग काढला आणि शाहू ऐवजी खंडेराव व जगज्जीवन या गुजर बंधूंना मुसलमान करावे अशी विनंती केली. त्यास बादशहा तयार झाला. येसूबाईंनी यावेळी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे शाहूचे धर्मांतर झाले नाही. पण गुजर बंधूंनी स्वराज्यासाठी त्याग करुन मुस्लिम धर्म स्विकारला. त्यांचे हे थोर उपकार शाहूराजे शेवटपर्यंत विसरले नाहीत.
जोत्याजी केसकर व मोरोपंत सबनीस यांनी रुस्तुमराव (लखोजी जाधव) यांचा नातू मानसिंग जाधवची कन्या राजसबाई आणि कन्हेरखेड शिंद्यांची अंबिकाबाई या मुली निवडल्या. २९ नोव्हेंबर १७०३ रोजी शाहूचा विवाह यांच्यासोबत लावण्यात आला. बादशहाने मोठा खर्च करुन हा विवाह सोहळा धुमधडाक्यात साजरा केला. या प्रसंगी बादशहाने शाहूस अक्कलकोट, इंदापूर, सुपे, बारामती व नेवासे या ठिकाणची जागीरी दिली व रायगडाच्या लुटीतून मिळालेली शिवाजी महाराजांची भवानी तलवार भेट म्हणून दिली. शाहू व येसूबाई खुश होवून आपल्यास दगा देणार नाहीत हा यामागे त्याचा उद्देश होता. याप्रसंगी बादशहाने नववधू पाहण्याची इच्छा प्रगट केली. मराठे स्त्रिया पडदा ठेवतात. परक्या माणसासमोर चेहरा दाखवत नाहीत. प्रसंगावधान राखून येसूबाईंनी बिरूबाई या दासीस शाहूची पत्नी म्हणून बादशहासमोर पाठवले आणि वेळ मारून ��ेली. ही बिरूबाई शेवटपर्यंत शाहूराजांसोबत राहिली. तिलाही इतर राण्यांप्रमाणे शेवटपर्यंत राणीचा मान मिळाला.  
१७०५ ते १७०७ या काळात बादशहासोबत हे सर्वजण अहमदनगरातच होते. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब वारला. बापाचा अंत्यविधी उरकून त्याचा मुलगा आझमशहाने अहमदनगरलाच आपले सिंहासनारोहण उरकले आणि स्वत:स बादशहा म्हणून घोषित केले. त्याचा मोठा भाऊ शहाआलम अफगाणिस्तानहून दिल्लीवर चालून येत आहे असे कळल्यामुळे तो तातडीने असदखान, झुल्फिकारखान यांच्यासोबत उत्तरेकडे निघाला. शाहू व येसूबाई यांना सोबतच घेतले होते. भोपाळजवळ नर्मदेच्या किनारी दोहरा या गावी त्याने छावणी केली होती. तिथे त्याला बातमी समजली की ताराबाईने मुघलांनी जिंकलेले बहुतांश किल्ले परत ताब्यात घेतले आहेत. झुल्फिकारखानासोबत सल्लामसलत करुन त्याने असे ठरविले की शाहूला मांडलिक करुन परत पाठवावे. जेणेकरुन भाऊबंदकीचे भांडण लागून स्वराज्यात आपले वर्चस्व स्थापन करता येईल. अन्यथा शिवाजीने जसे स्वराज्य उभे केले तसे परत उभे राहिले तर दक्षिणेत आपणास कुणी भिक घालणार नाही. एका अर्थाने त्याचा विचार खराच ठरला. औरंगजेबानेही असा विचार  केलेला होता, पण आमलात आणला नव्हता. त्याला वाटले की मराठे सरदार शाहूला मिळून परत जोम धरतील आणि पुन्हा मराठेशाही उभी राहिल. आझमशहाने मात्र वेळ न दडवता शाहूशी करार केला की ‘तुम्ही बादशहाचे अंकित म्हणून राज्य चालवावे. बादशहाच्या हुकुमात रहावे व बेईमानी करु नये. गरज भासेल तेव्हा फौजेनिशी बादशहाच्या सेवेस हजर रहावे. त्या बदल्यात दक्षिणेतल्या मुघल राज्यातील सहा सुभ्यातून चौथाई वसूल करावी. त्या संबंधीच्या सनदा मागाहून पाठवण्यात येतील. येसूबाई, मदनसिंग व इतर कबिला ओलीस म्हणून बादशहाचे ताब्यात रहातील. दक्षिणेत जाण्यासाठी दोनशे स्वार सोबत न्यावेत.’ इत्यादी अटी घालण्यात आल्या. हा करार शाहूने मान्य केला. शाहूला कैदेतून मोकळे करण्यात आले आणि दोनशे स्वारांसह ८ मे १७०७ रोजी शाहूने दक्षिणेकडे कूच केले.
शाहूमहाराजांच्या सुटकेमुळे मराठ्यात दोन गट पडले. एका गटाला शाहू मोठा म्हणून त्यानेच राज्य चालवावे असे वाटत होते, तर दुसर्‍या गटाला ताराबाईने बलाढ्य औरंगजेबाला लढा देवून स्वराज्य टिकवले म्हणून ताराबाईने – अर्थात शिवाजीने राज्य चालवावे असे वाटत होते. जून १७०७ मध्ये शाहू खानदेशात पोहोचल्यापासून त्याने अनेक सरदारांना पत्रे लिहून आपल्या बाजूने एकनिष्ठ रहावे असे सुचवणे सूरू केले. त्याचा परिणाम होवून त्यांना अनेक छोटे मोठे सरदार येवून मिळाले, प्रामुख्याने परसोजी भोसले त्यांच्यात सामील झाले.
या शिष्टाई सोबतच शाहू मुघलांच्या हालचालीकडेही लक्ष ठेवून होते. शाहूला करार बंधनात अडकवून आझमशहा आग्रयाकडे निघाला. तिथे ८ जून १७०७ रोजी त्याचा भाऊ शहाआलम (बहादूरशहा) याच्याशी झालेल्या तुंबळ लढाईत तो मारला गेला आणि बहादूरशहा बादशहा झाला. त्याचे वय चौसष्ट होते. या प्रसंगी त्याचा एक भाऊ कामबक्ष दक्षिणेत होता. कामबक्षनेही स्वत:ला बादशहा घोषित केले होते. त्यामुळे बहादूरशहाला त्याचाही बंदोबस्त करायचा होता म्हणून दिल्ली तख्तावर बसल्यावर काही दिवसातच त्याने दक्षिणेकडे कूच केले.
शाहू खानदेशातून नगरला पोहोचला. दोन महिने तिथे त्यांचे वास्तव्य होते. बादशहाचे मन जिंकण्यासाठी त्याने औरंगजेबाची अंत्यसमयीची जागा आणि खुलताबाद येथील त्याच्या दफनभुमीच्या जागेचे दर्शन घेतले. नगरहूनच ताराबाईंशी त्यांनी तडजोड सुरू केली. पण ताराबाई राज्य सोडायला तयार नव्हत्या. बादशहाचे मांडलिकत्व स्विकारलेला व्यक्ती छत्रपतीच्या गादीसाठी योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. शिवाजी महाराजांचे राज्य संभाजीराजांनी नेटाने चालविले, पण ते टिकविण्याचे अवघड काम छ. राजाराम व नंतर छ. बाल शिवाजीने केले. त्यामुळे शिवाजीचाच गादीवर हक्क आहे, याच मताशी त्या ठाम होत्या. पण अनेक सरदार व परसोजी भोसले शाहूच्या बाजूने होते. ज्येष्ठत्वाच्या नात्याने शाहूच गादीसाठी योग्य असे या सरदारांचे मत होते. रामचंद्रपंतांची अवस्था बिकट झाली होती. दोघेही शिवाजी महाराजांचेच वंशज, त्यामुळे कुणाची बाजू घेणार! कठिण परिस्थितीत ताराबाईने हिमतीने राज्य टिकवले हे खरे होते, पण त्यांचा मुलगा शिवाजी सक्षम नसून शाहूच गादीसाठी योग्य आहे असे त्यांना वाटत होते. पण ताराबाई यास तयार नव्हत्या. त्यामुळे केवळ अनिच्छेनेच रामचंद्रपंत ताराबाईशी एकनिष्ठ राहिले.
शाहूने ताराबाईस अनेक पत्रे लिहिली. ‘राज्य आम्हास सोपवावे. आपण मातुश्री आहात, आम्ही आपणास काही कमी पडू देणार नाही’. याला ताराबाई बधल्या नाहीत. त्यांनी हा शाहू तोतया आहे अशी आवई उठवली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शाहू नगरहून सातार्‍याकडे निघाले. भीमेच्या तीरी खेड येथे त्यांनी छावणी केली. ताराबाईने धनाजी जाधव, परशुरामपंत यांना शाहूवर आक्रमण करण्यास पाठवले. १२ ऑक्टोबर १७०७ मध्ये दोन्ही सैन्यात युद्ध झाले. पण शाहूविरुद्ध कुणी मनापासून हत्यार उचलले नाही. खेडच्या या युद्धात शाहूचा विजय झाला. खंडो बल्लाळ व बाळाजी विश्वनाथ यांची शिष्टाई या प्रसंगी कामास आली आणि धनाजी जाधव शाहूस सामील झाले. परशुरामपंत आपल्या सैन्यानिशी सातार्‍याला ताराबाईकडे गेले.
खेडची लढाई जिंकल्यामुळे शाहूच्या सैन्याला स्फूर्ती आली होती. सरदारात नवे चैतन्य आले होते. शाहूने तिथून चाकण, जेजूरी मार्गे सातार्‍याकडे आपल्या फौजा वळवल्या. शिरवळ जवळ रोहिडा किल्ल्यात ताराबाईंचे सचिव शंकराजी नारायण होते. ताराबाई की शाहू या द्विधा मन:स्थितीत त्यांनी हिरकणी खा��न २७ ऑक्टोबर १७०७ रोजी आत्महत्या केली. शाहूने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांचा पूत्र नारो शंकर याला आपला सचिव नेमले. यामुळे शाहूची किर्ती सर्वत्र पसरली. राजगड, तोरणा, रोहिडा आदी किल्ले शाहूकडे आले.
यानंतर नोव्हेंबर १७०७ मध्ये त्यांनी सातार्‍याला वेढा घातला. परशुरामपंतांवर किल्ला सोपवून ताराबाई पन्हाळ्यावर गेल्या. शाहूने परशुरामपंतास शरण येण्यास सांगितले, पण ही मागणी त्यांनी अमान्य केली. किल्ल्याचा हवालदार शेख मिरा यास फितवून शाहूने डिसेंबर १७०७ मध्ये सातारा राजधानी आपल्या ताब्यात घेतली. परशुरामपंतास कैद करण्यात आले.
इकडे बहादूरशहा कामबक्षाचा निकाल लावण्यासाठी दक्षिणेकडे निघाला होता. या बातमीने शाहू व त्यांच्या सरदारांची बादशहास सहाय्य करण्याचा करार केलेला असल्यामुळे त्रेधा उडाली. याप्रसंगी शांत राहणेच त्यांनी पसंद केले.
सातारा शाहूच्या ताब्यात आला. राजधानीत आल्यावर पंधरा दिवसातच म्हणजे १२ जानेवारी १७०८ रोजी शाहूमहाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ‘क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति’ हे स्वराज्याचे पाचवे छत्रपती सिंहासनावर बसले. याप्रसंगी शाहूमहाराजांनी प्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. सुरूवातीच्या काळात रायभानजी भोसले व सावत्र भाऊ मदनसिंग हे शाहूराजांचे मुख्य सल्लागार होते. रायभानजी मुघलांकडे दक्षिणेत सरदार होते तर मदनसिंग हे येसूबाईसह आग्र्यास होते.
राज्याभिषेक झाला पण शाहूमहाराजांच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या. पन्हाळ्यावर ताराबाईंनी सैन्याची जुळवाजुळव चालू केली होती. आपसातील कलह संपवण्याच्या दृष्टीने शाहूमहाराजांनी १६ जानेवारी १७०८ रोजी ताराबाई व शिवाजीला कोल्हापूरजवळील वारणेच्या दक्षिणेकडचा प्रदेश तोडून द्यायची तयारी दाखवली व शिवाजीने छत्रपतींचे मांडलिकत्व स्विकारुन स्वत:च्या प्रदेशात स्वतंत्र राज्य करावे असे सुचवले. पण ताराबाईंनी हे मान्य केले नाही. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष सुरू राहिला.
पन्हाळ्यावर ताराबाईंच्या आज्ञेवरुन रामचंद्रपंतांनी शिवाजीचे अमात्यपद चालू केले. अनेक सरदारांना पत्रे लिहून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु केला. खंडो बल्लाळ व धनाजी जाधव शाहूमहाराजांकडे होते. परशुरामपंत सातार्‍यात कैदेत होते. पण खेम सावंत व कान्होजी आंग्रे यांना ताराबाईंनी आपल्या गोटात ओढले. तरी शाहूमहाराजांच्या तुलनेत त्यांचा ताफा कमीच होता. फेब्रुवारी १७०८ च्या सुरुवातीलाच शाहूमहाराजांनी पन्हाळ्यावर आक्रमण केले. अनेक छोटे मोठे किल्ले हस्तगत करत त्यांनी पन्हाळाही सहज ताब्यात घेतला. ते पन्हाळ्यावर पोहोचण्यापूर्वीच ताराबाई रांगणागडावर गेल्या होत्या. रांगणा पन्हाळ्यापासून पन्नास साठ किलोमिटर अंतरावर होता. शाहू इथेही पोहोचेल म्हणून तिथे गेल्याबरोबर त्यांनी किल्ल्याचा कडेकोट बंदोबस्त करुन घेतला.
अपेक्षेप्रमाणे शाहूमहाराजांनी रांगण्याला वेढा दिला. सुरक्षिततेसाठी रामचंद्रपंतांनी ताराबाई, राजसबाई, शिवाजी व संभाजीस सिंधूदुर्गला पोहोचवले. तिथूनही ताराबाईंनी अनेक सरदरांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न चालविले. त्यात त्यांना थोडेफार यशही आले. रांगण्याला तीन महिने वेढा देवूनही शाहूमहाराजांना गड ताब्यात घेता आला नाही. रामचंद्रपंत आणि ताराबाईंचे सेनापती पिराजी घोरपडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन गड पडू दिला नाही. १७०८ चे मार्च, एप्रिल आणि मे रांगणा लढवण्यात गेले. पावसाळा सुरु होण्याआधी शाहूमहाराज रांगणा गडाची मोहिम रहित करुन पन्हाळ्यावर आले. ताराबाईंसोबत सुरू असलेल्या लढाईत हा पहिलाच पराभव शाहूमहाराजांना स्विकारावा लागला.
१७०८ चा पावसाळा शाहूमहाराज पन्हाळ्यातच होते. त्यावेळी धनाजी जाधव खानदेश आणि बागलाण येथे वसुलीसाठी गेले होते. पायाला जखम झाल्याचे निमित्त झाले आणि २७ जून १७०८ रोजी थोड्याशा आजारात सेनापती धनाजी जाधव यांचा मृत्यू झाला. शाहूमहाराजांना याचा मोठा धक्का बसला. त्यांची राजनिष्ठा व कर्तृत्व याची जाणीव ठेवून महाराजांनी धनाजींचा मुलगा चंद्रसेन जाधव यास सेनापती पदाची वस्त्रे बहाल केली.
एकीकडे बादशहाच्या हालचालीवरही नजर ठेवावी लागत असे. नवा बादशहा बहादूरशहा कामबक्षला संपवण्यासाठी ऑक्टोबर १७०८ मध्ये दक्षिणेत बिदरला आला होता. त्यासाठी पावसाळ्यानंतर १७०८ च्या शेवटी शाहूमहाराज सातार्‍यास परत आले. ही नामी संधी साधून ताराबाई परत रांगणा गडावर आल्या आणि त्यांनी आपल्या फौजेची मोठी जमवाजमव करुन पन्हाळ्यावर आक्रमण केले. अगदी सहजतेने त्यांना पन्हाळा परत मिळाला. मालवणपासून पन्हाळा, रांगणा हा भाग ताराबाईच्या आखत्यारीत आला.
उत्तरेकडच्या घडामोडीत शाहूराजे अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना परत ताराबाईची मोहिम लगेच हाती घेता आली नाही. बादशहाला मदत करण्यासाठी शाहूमहाराजांना बोलावण्यात आले होते. पण राज्यातील सध्याच्या परिस्थितीची बादशहाला जाणीव करुन देवून स्वत: न जाता शाहूमहाराजांनी नेमाजी शिंदे यास फौजेनिशी पाठवले. रायभानजी व मानसिंग जाधव बादशहा सोबतच होते. त्यांच्या मार्फत शाहूराजांना बादशहाच्या बातम्या कळत होत्या. कामबक्षने औरंगजेबचे निधन झाल्यावर आजमेर येथे स्वत:ला ताजपोशी केली होती. त्याला संपवल्याशिवाय बहादूरशहाला संपूर्णपणे बादशहा होता येत नव्हते. ३ जानेवारी १७०९ रोजी हैदराबादजवळ या दोन्ही भावांमध्ये युद्ध झाले. यात कामबक्ष मारला गेला. बहादूरशहाच्या रस्त्यातला शेवटचा काटा नष्ट झाला आणि अडुसष्ठ वर्षाचा शहाआलम-बहादूरशहा हिंदुस्थानचा बादशहा झाला. हैदराबादला तीन महिने राहून मे १७०९ मध्ये अहमदनगरास येवून त्याने शाहूराजांतर्फे आलेले प्रतिनिधी गदाधर प्रल्हाद व रायभानजी यांची भेट घेतली. त्यांनी दक्षिणेकडची चौथ वसुलीच्या सनदा शाहूराजास देण्याची विनंती केली. पण त्याचवेळी ताराबाईंच्या वकिलानेही सनदा मागितल्यामुळे बहादूरशहाने सनद देण्याचे काम तूर्तास थांबविले. बादशहाच्या दृष्टीने मराठ्यात पडलेली ही दुफ��ी फायद्याची होती. त्याने हे प्रकरण झुलवत ठेवायचे ठरवले आणि काही दिवसातच औरंगाबाद मार्गे जून १७०९ मध्ये तो दिल्लीस परतला.
स्वराज्यात भाऊबंदकीचे युद्ध पेटून मराठेशाही संपुष्टात येईल ही बादशहाला खात्री होती आणि वस्तुस्थितीही तशीच दिसत होती. ताराबाईंचा नायनाट केल्याशिवाय आपणास सरदेशमुखीच्या सनदा मिळू शकत नाहीत असे शाहूराजांना वाटत होते तर शाहूचा अडसर दूर केल्याशिवाय गादीवर संपूर्णत: आपले वर्चस्व राहणार नाही असे ताराबाईंना वाटत होते. दोघेही सैन्याची जमवाजमव करण्यात व सरदार फोडण्यात व्यस्त झाले होते. एकमेकांच्या ताब्यातील लहान मोठी ठिकाणे हस्तगत करणे आणि लोकांना आपल्या हुकमतीखाली आणणे असे प्रकार चालू झाले होते.
परासोजी भोसले जून १७०९ च्या आसपास वारले. त्यामुळे ताराबाईंना कोल्हापूर भागात विरोध कुणाचा राहिला नाही. रामचंद्रपंतांनी रांगणा, पन्हाळा, कोल्हापूर या भागाचा चांगला बंदोबस्त करुन त्या भागावर सत्ता मजबूत करण्याचा सल्ला ताराबाईंना दिला. त्याचवेळी सावंतवाडीच्या सावंतांनी उपद्रव सुरू केला. रामचंद्रपंतांनी कान्होजी आंग्रेंच्या मदतीने हा उपद्रव मोडून काढला आणि सावंतांना आपल्या आमलात आणले. यामुळे ताराबाईंचे पारडे जड झाले. या गोष्टीचा फायदा घेवून ताराबाईंनी १७१० च्या सुरुवातीला शिवाजीमहाराज यांच्या छत्रपतिपदाची द्वाही फिरवली व छत्रपतींची राजधानी सातारा नसून पन्हाळा आहे असे जाहीर केले. नोव्हेंबर १७१० मध्ये त्यांनी ‘करवीर’ या स्वतंत्र रियासतीची घोषणा केली.  
कोल्हापूरच्या उत्तरेस शाहूमहाराजांचे राज्य तर दक्षिणेस मुघलांचे राज्य. अशा परिस्थितीत १७१० - ११ या काळात पन्हाळ्याचे राज्य चोहोबाजूने मर्यादित होते. ताराबाईंचे खंदे समर्थक परशुरामपंत शाहूराजांकडे कैद होते. रामचंद्रपंत, कान्होजी आंग्रे यांची मात्र साथ होती. १७११ मध्येच शाहूराजांचे सेनापती चंद्रसेन आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात वाद झाल्यामुळे चंद्रसेन जाधव ताराबाईंच्या पक्षात गेले. शाहूमहाराजांनी बाळाजी विश्वनाथची बाजू घेतल्यामुळे चंद्रसेन नाराज झाला होता. यामुळे ताराबाईंचे सामर्थ्य वाढले. ताराबाईंनी चंद्रसेनला सेनापतिपद दिले आणि शाहूमहाराजांचे खच्चीकरण करण्याचा खटाटोप सुरु झाला.
२ डिसेंबर १७११ रोजी बाळाजी विश्वनाथने मुघलांचा मनसबदार कृष्णाजी खटावकर, जो ताराबाईंच्या पक्षात होता, त्यावर अचानक हल्ला करुन खटाव ताब्यात घेतले. कृष्णराव या लढाईत मारला गेला. यामुळे शाहूराजांच्या पक्षात नवचैतन्य आले. चंद्रसेन गेल्यामुळे आलेली खिन्नता काही अंशी कमी झाली. या घटनेनंतर शाहूराजांनी परशुरामपंतास मुक्त करुन त्यांना प्रतिनिधीपद दिले.
पुढचे दोन वर्ष आपसातील संघर्षातच गेले. ताराबाई आणि शाहूराजे आपापला पक्ष मजबूत करण्यात आणि जमेल तसे आपले राज्य बळकट करण्यात गुंतले होते. मुघलांकडे असलेले किल्ले अजून दोन्ही पक्षांनी ताब्यात घेतले नव्हते. मुघलांचा रोष ओढवून घेणे सद्य परिस्थितीत अंगाशी आले असत�� हे त्यामागचे कारण होते. या दरम्यान मुघलांनी दक्षिणेत नेमलेला हैद्राबादच्या निजामाने ऑक्टोबर १७१३ मध्ये सुभेदारीचा पूर्ण अधिकार घेतला आणि तो स्वतंत्रपणे दक्षिणेत राज्य चालवू लागला. त्यामुळे करवीर रियासत, शाहूराजे आणि निजाम राजवट असे तीन भाग दक्षिणेत निर्माण झाले. पण तूर्तास मराठेशाहीतील दोन्ही छत्रपतींनी निजामशाहीकडे दुर्लक्ष केले व एकमेकांचा कसा पाडाव करता येईल यातच ते व्यस्त झाले.
कान्होजी आंग्रेचा बंदोबस्त केल्याशिवाय ताराबाईंचे वर्चस्व कमी होणार नाही हे शाहूराजांना ठाऊक होते. चंद्रसेन व आंग्र्यांनी शाहूराजांच्या प्रदेशावर हल्ले करुन उपद्रव माजवला होता. त्यामुळे बहिरोपंत पिंगळे आणि निळो बल्लाळ यांना मोठी फौज देवून शाहूमहाराजांनी आंग्रेच्या मोहिमेवर पाठवले. पण त्यांचा निभाव लागला नाही. बहिरोपंताला आंग्रेंनी कैद केले. शाहूराजांच्या या पराभवामुळे ताराबाई, चंद्रसेन, आंग्रे यांना सातार्‍याची गादी हस्तगत करण्याचा आत्मविश्वास वाढला.
कान्होजी आंग्रेंचा पाडाव केल्याशिवाय शाहूमहाराजांना आपली गादी टिकवणे अशक्य होते. चंद्रसेन निघून गेल्यामुळे आणि खटावकरांचा पाडाव केल्यामुळे शाहूच्या पक्षात बाळाजी विश्वनाथची पत वाढली होती. तसे शाहूराजांना बादशहाच्या कैदेतून सोडवण्यापासून, म्हणजे १७०३ पासून, तसेच १७०७ ला सुटका झाल्यापासून ते नंतर १७०७ च्या खेडच्या लढाईपासून बाळाजी विश्वनाथ शाहूराजांचा मुख्य सहाय्यकर्ता बनला होता. बाळाजी विश्वनाथने कधी लढून तर कधी शिष्टाईने अनेक सरदारांना शाहूच्या पक्षात सामील केले होते. कठिण प्रसंगात त्याने चतुराईने विरोधकास समज देवून शाहूराजांचा पक्ष मजबूत केला होता. या त्यांच्या कर्तबगारीमुळे खंडो बल्लाळ आणि परशुरामपंतांनी बाळाजी विश्वनाथ हेच आंग्र्यांचा बंदोबस्त करण्यास योग्य आहेत असे शाहूराजांना सुचवले. शाहूराजांनाही मनापासून हेच वाटत होते. त्यामुळे त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना कान्होजी आंग्रेचा पाडाव करण्याच्या मोहिमेवर पाठवायचे ठरवले.
बाळाजी विश्वनाथने ही सुवर्णसंधी मानून तत्परता दाखविली. पेशवा बहिरोपंत पिंगळे त्यावेळी आंग्रेंच्या कैदेत होते. पेशवेपद रिकामेच होते. बाळाजी विश्वनाथनी पेशवेपद आपणास मिळावे म्हणजे खुद्द पेशवे चालून आले तर आंग्रेंवर दबाव राहिल व मोहिम फत्ते करणे सुलभ होईल अशी शाहूराजांना विनंती केली. शाहूराजांनाही पदांच्या नेमणुका आपण आपल्या मर्जीप्रमाणे करु शकतो हे दाखवायचे होते, तसेच आंग्रेंना आपली कर्तबगारी निदर्शनास आणून द्यायची होती. तुम्ही गैरमर्जीने वागाल तर दर्याच्या सरखेलीवर दुसरा कुणी नेमावा लागेल हेही दाखवून द्यायचे होते. खंडो बल्लाळ आणि परशुरामपंत यांनीसुद्धा याला दुजोरा दिला. सध्याची परिस्थिती आणि बाळाजी विश्वनाथचे आजवरचे धडाडीचे कार्य पाहून, तसेच बहिरोपंत पिंगळेंपेक्षा बाळाजी विश्वनाथ जास्त कर्तृत्ववान आहेत हा विचार करुन शाहूराजे यास लगेच तयार झाले.  
१७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याजवळ मांजरी येथे मुक्कामी असतांना शाहूमहाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे दिली. त्याचवेळी अंबाजीपंत पुर��दरे यांना मुतालिकी आणि रामाजीपंत भानु यांना फडणीसी देवू केली.
पेशवाईची वस्त्रे मिळाल्यावर काही दिवसातच सर्व सिद्धता करुन बाळाजी विश्वनाथ डिसेंबर १७१३ मध्ये आंग्रेच्या मोहिमेवर चालून गेले. या मोहिमेत त्यांच्या आंग्रेसोबत अनेक बैठका झाल्या. दोन अडीच महिने चाललेल्या या मोहिमेत एकदाही तलवार चालली नाही की गोळी उडाली नाही, केवळ आपल्या बुद्धी चातुर्याने व मुत्सद्दीगीरीने बाळाजींनी आंग्र्यांचे मन वळवले. शिवाजीमहाराजांचे राज्य रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या प्रत्येक मराठ्यांची आहे या कर्तव्याची जाणीव आंग्र्यांना त्यांनी करुन दिली. तसेच सरखेल पदाचा अधिकार शाहूमहाराजांकडून कायम करण्याचे आश्वासनही दिले. ताराबाईंपेक्षा शाहूराजांना सामील होण्यात कोणते हित आहे, तसेच सिद्दीशी सामना करायचा झाल्यास शाहूराजांचेच बळ कसे कामाला येईल इत्यादी मुद्दे पटवून बाळाजींनी आंग्र्यांचे मन परिवर्तन केले आणि ८ फेब्रुवारी १७१४ रोजी केवळ मुत्सद्देगीरीच्या जोरावर आंग्रेंना शाहूराजांच्या पक्षात सामील करून घेतले.
कान्होजी आंग्रे सारखा मातब्बर सरदार कुठलेही रक्तपात न होता बाळाजींनी शाहूराजांच्या पक्षात आणला या कार्यामुळे बाळाजींची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात वाखाणली गेली. यामुळे राज्यात बाळाजींचे महत्व वाढले. त्यांच्या या मुत्सद्देगीरीचा प्रभाव शाहूमहाराजांवर व रयतेवर चांगलाच पडला. या घटनेपासून स्वराज्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
 ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌--------------------------------------------------------------------------------------------------------------
शाहूमहाराजांचा (I) वंश :
पत्नी :
१.      राजसबाई उर्फ सावित्रीबाई (रुस्तुमराव जाधव यांचा नातू मानसिंग याची कन्या) : विवाह – २९ नोव्हेंबर १७०३, शाहूची सुटका झाल्यानंतर या येसूबाईंसोबत दिल्लीस गेल्या. स. १७१९ च्या आसपास परत स्वराज्यात आल्यानंतर वारल्या. अपत्ये -  
२.      अंबिकाबाई (कन्हेरखेड शिंदे यांची कन्या) : विवाह – २९ नोव्हेंबर १७०३, शाहूराजे बादशहाच्या कैदेत असतांनाच अंबिकाबाई वारल्या. अपत्ये –
३.      सकवारबाई (राणोजी शिर्के यांची कन्या) - थोरली धनीण : विवाह – अंदाजे १७१४ सातारा येथे. शाहूमहाराजांच्या मृत्युसमयी १५ डिसेंबर १७४९ रोजी सती गेल्या. अपत्ये -
४.      सगुणाबाई (मोहिते) – धाकटी धनीण : विवाह – अंदाजे १७२१, मृत्यू २५ ऑगस्ट १७४८.
अपत्ये -  
अपत्ये : संभाजी व अजून एक मुलगा आणि चार मुली. मुले जगली नाहीत. दत्तक पूत्र – राजाराम (ताराबाईंचा नातू, त्यांचा पुत्र शिवाजीचा मुलगा)   
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – १०
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
३ जानेवारी १६९० ला औरंगजेबाने तुळापूर-कोरेगावहून आपली छावणी विजापूरला हलवली. ३ मे १६९० रोजी त्याने बागलकोट जवळील गलगली येथे छावणी केली. संभाजीराजांचा वध करूनही त्याला संपूर्ण विजय संपादित करता येत नव्हता यामुळे तो अस्वस्थ होता. आपले अनेक सरदार त्याने स्वराज्यावर कब्जा करण्यासाठी व राजाराम महाराजांना बंदिस्त करण्यासाठी नेमले होते. पण चोहिकडून त्याला शिकस्त खावी लागत होती.
राजाराम महाराजांना जिंजीला धाडून रामचंद्रपंत अमात्य स्वराज्य रक्षणासाठी मागे थांबले होते. मुघलांच्या प्रचंड सेनेसमोर राजाराम राज्यातल्या कुठल्याही किल्ल्यात थांबले असते तरी त्यांच्या ताब्यात आले असते. पण ते जिंजीला गेल्यामुळे औरंगजेबापुढे मोठा प्रश्न होता की जिंजीला जावून राजारामाला पकडावे का स्वराज्यातले बळकावलेले किल्ले ताब्यत घेवून शांत बसावे. त्याला असे वाटले होते की मराठेशाही वारसाच्या भांडणात गुरफटून संपुष्टात येईल, पण त्याचा अंदाज चुकला.
राजाराम जिंजीला पोहोचताच नोव्हेंबर १६८९ मध्येच मराठ्यांच्या हालचालींना वेग आला. रामचंद्रपंतांनी मराठी सैन्याचे नियोजन केले. मुकर्रबखान कोल्हापूर भागात ठाण मांडून बसला होता. संताजीने अचानक त्यावर हल्ला करुन त्याला तिथून हुसकावून लावले. शंकराजी नारायण याने कोकणात ठाण मांडून बसलेल्या मुघलांना तिथून पळवून लावले. स्वत: रामचंद्र अमात्याने प्रतापगड परत जिंकून घेतला. एकंदर मुघली ठाणी उधळून लावणे, किल्ले ताब्यात घेणे, गनिमी काव्याने मुघलांवर अचानक तुटून पडणे यात मराठ्यांना यश मिळत गेले आणि गनिमांचे धाबे दणाणले.
कोल्हापूरहुन पळालेला मुकर्रबखान सातार्‍यात जावून बसला होता. मे १६९० मध्ये संताजी व धनाजी त्याच्यावर चालून गेले आणि त्याला तिथून पळवून लावले. अनेक मुघल ठाणी या जोडीने उद्ध्वस्त केली. गनिमी युद्ध नीतीने त्यांनी मुघलांना सळो की पळो करुन सोडले. गर्भगळीत झालेल्या मुघलांकडून त्यांनी रोहिडा, तोरणा व राजगड परत मिळवले. १६९० साल संपेपर्यंत मराठ्यांनी अनेक किल्ले जिंकून परत घेतले. सातारा, परळी, राजमाची, विशाळगड, वसंतगड हे आधीपासून मराठ्यांकडेच होते.
रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी-धानाजी यांच्या पराक्रमाची बातमी सर्वदूर पसरली होती. त्यामुळे अनेक तरुण सैन्यात भरती होण्यास पुढे आले. राजारामाने स्वराज्याचे रक्षण करणार्‍यांना वतने देण्याचे जाहिर केले. स्वराज्य रक्षणासाठी सद्य परिस्थितीत हाच योग्य मार्ग होता. मराठ्यांचे धाडस पाहुन मुघलांना मिळालेले अनेक वतनदार परत स्वराज्यात सामिल झाले. औरंगजेबाचे स्वराज्यावरचे अधिपत्य कमी करण्यासाठी हे पाऊल फार महत्वाचे होते.
जिंजी स्वराज्याची राजधानी बनली होती. तिथून स्वराज्य रक्षणाच्या वेगात हालचाली होत होत्या. हे पाहून औरंगजेबाने आपला मुलगा कामबक्ष आणि वजीर असदखान यांना डिसेंबर १६९१ मध्ये जिंजीवर पाठवले. झुल्फिकारखान आधीच तिथे वेढा देवून बसला होता. लवकरच महाराष्ट्रातून संताजी-धनाजी मोठे लष्कर घेवून जिंजीला पोहोचले. त्यांनी डिसेंबर १६९२ मध्ये मुघलांची दाणादाण उडवली. त्यामुळे झुल्फिकारखानाने २२ जानेवारी १६९३ ला जिंजीचा वेढा उठवून तिथून काढता पाय घेतला.
जिंजीला झालेल्या या फजितीला घाबरुन कामबक्ष हताश झाला. बादशहा आपले मस्तक उडवेल ही त्याने धास्ती घेतली. पण पंचाहत्तरी ओलांडलेल्या म्हातार्‍या औरंगजेबाने त्याला अभय दिले. ११ मे १६९५ रोजी बादशाने भीमा नदीच्या काठावरील ब्रम्हपुरीत छावणी केली. पंढरपूरपासून ३० कि.मी. वरच्या या गावाचे नाव त्याने इस्लामपुरी ठेवले. प्रशस्त महाल, दरबार, सरदारांची घरे तिथे बांधण्यात आली. सर्व प्रवासात येसूबाई, शाहूराजे यांनाही सोबत नेले जायचे. घात करून क���णी त्यांना पळवून नेवू नये म्हणून बादशहाच्या निवासाशेजारीच त्यांना ठेवण्यात यायचे.
संताजी - धनाजी यांनी पराक्रमाची परिसिमा गाठलेली होती. मुघल सैन्य सतत त्यांच्या दहशतीतच असायचे. रामचंद्रपंत आणि शंकराजी नारायण यांनीही मुघलांना सळो की पळो करुन सोडले होते. या सर्वांचा मराठ्यांचे साम्राज्य परत उभे करण्यात प्रचंड वाटा होता.  
जिंजीला मुघलांच्या धडका चालूच होत्या. स्वराज्यातही त्यांनी किल्ले घेण्याचा सपाटा लावला होता. पण संताजी धनाजी व बाकी मराठ्यांनी मुघलांच्या छावण्यात उच्छाद मांडून त्यांना हैरान करुन सोडले होते. याचव��ळी जिंजीत ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना पूत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.                  
संभाजीराजांचे सेनापती म्हाळोजी घोरपडे नंतर त्यांची तिन्ही मुले संताजी, बहिर्जी आणि मालोजी यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व वाहिले. १६९१ मध्ये राजाराम महाराजांनी संताजीला सेनापती केले होते. धनाजी वयाने संताजीपेक्षा मोठा होता. पण संताजीला सेनापती केल्यामुळे धनाजी आतून खूप दुखावला गेला होता. इ.स. १६९६ मध्ये संताजी आणि धनाजी मधील तंटा विकोपाला गेला होता. आयेवार कुटिया या ठिकाणी संताजी आणि धनाजीच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. नागोजी मानेचा मेव्हणा अमृतराव निंबाळकर याला पकडून संताजीने हत्तीच्या पायी दिले. ही गोष्ट राजाराम महाराजांनाही आवडली नाही. संताजी त्यांनाही डोईजड वाटू लागला. २७ ऑक्टोबर १६९६ मध्ये संताजीचे सेनापती पद काढून धनाजी जाधवास ते देण्यात आले. या संधीचा फायदा बादशहाने करुन नाही घेतला तरच नवल! त्याने नागोजी मानेकरवी सातारा जवळ म्हसवड येथे जून १६९७ मध्ये बेसावध संताजीस ठार मारले. संताजी यावेळी नदीवर स्नान करत होते आणि निशस्त्र होते. त्याचवेळी नागोजीचे लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांचा वध केला! या कामगिरीवर खूश होवून नागोजीला बादशहाने मनसब बहाल केली.
संताजी घोरपडेचा वध ही घटना मराठी इतिहासाची शोकांतिकाच होती! संताजी – धनाजी मध्ये बेबनाव झाला नसता तर इतिहास वेगळाच दिसला असता.                                                                                                            
औरंगजेबाला कशाही परिस्थितीत राजाराम अन जिंजी पाहिजे होती. त्याला वाटले होते की शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठेशाही नष्ट होईल, संभाजीराजांना मारल्यावर मराठेशाही संपुष्टात येईल, पण त्यानंतर आठ नऊ वर्षाचा काळ जावूनही त्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. १६९७ पर्यंत जुल्फिकारखान जिंजीच्या आसपासच रेंगाळत राहिला. औरंगजेब तर जिंजीसाठी जिद्दीवरच पडला होता. त्यामुळे जिंजीवरून कारभार चालवणे कठिण होवू लागले हे लक्षात घेवून डिसेंबर १६९७ मध्ये राजाराम महाराज जिंजीतून बाहेर पडले आणि सुखरुप २२ फेब्रुवारी १६९८ ला विशाळगडावर पोहोचले. जवळ जवळ आठ वर्ष जिंजीला मुघलांचा वेढा होता, पण मराठ्यांच्या अतु��नीय पराक्रम आणि मुत्सद्देगिरीमुळे राजाराम महाराजांना व जिंजीला काबीज करणे मुघलांना लवकर शक्य झाले नाही. राजाराम महाराज तिथून बाहेर पडल्यावरच ७ फेब्रुवारी १६९८ रोजी जिंजी किल्ला झुल्फिकारखानाने काबीज केला. यावेळी औरंगजेब ब्रम्हपुरी येथेच होता.
अदिलशाही, कुतुबशाहीवर ताबा मिळवूनही मुघलांना या विस्तीर्ण प्रदेशाचे संरक्षण करता आले नाही. मराठ्यांना आवर घालणे त्यांना शक्य झाले नाही. नाशिकपासून जिंजी-तंजावरपर्यंत मराठ्यांनी या काळात खूप धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण यांनी कार्यक्षमपणे राजकारभार चालविल्यामुळे राजांची उणीव जनतेला भासली नाही. अन आता प्रत्यक्ष राजाराम महाराज महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे मराठ्यांचा जोश वाढला होता. एप्रिल १६९८ पर्यंत राजारामराजे विशाळगडावरच होते. पण विशाळगड एका बाजूस पडत होते. रायगड मुघलांच्या ताब्यात होते. त्यामुळे बादशहाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सातारा किल्ला सोयीचा असल्यामुळे ज्येष्ठ जाणकारांच्या सल्ल्याने त्यांनी सातारा किल्ल्यात स्थलांतर केले.
मुघलांच्या छावण्यावर हल्ले करुन दहशत पसरवणे व लूट जमवण्याचे काम धनाजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांनी चालू ठेवले होते. धन कमी पडत होते म्हणून राजाराम महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याचे ठरवले होते. पण मुघलांच्या सतर्कतेमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
राजाराम महाराजांचा अंत : संभाजीमहाराज गेल्यापासून सतत आकरा वर्ष राजाराम महाराजांची धावपळच चालली होती. रायग़ड ते जिंजी आणि परत जिंजी ते सातारा हा प्रवास, अशा सततच्या धावपळीमुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांचे सुरुवातीचे वय नजरकैदेतच गेले होते. त्यामुळे त्यांची मैदानी तयारी कमीच होती. घोड्यावरचा सरावही त्यांना कमीच लाभला. संभाजीराजांच्या तुलनेत शारीरिक दृष्ट्या ते कमजोरच होते. महारष्ट्रात परत आल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोकण, नगर, सोलापूर आदी भागात मोहिमेवर बाहेर पडलेल्या राजाराम महाराजांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे रामचंद्रपंतांनी त्यांना विश्रांतीसाठी सिंहगडावर आणले. पण आजार कमी न होता वाढतच गेला. या आजाराचे निमित्त झाले आणि त्यातच ३ मार्च १७०० रोजी रक्ताच्या गुळण्या होऊन राजाराम महाराज निधन पावले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपासून अतिशय कठिण काळात राज्याचे रक्षण करणारे अवघ्या ३० वर्ष वयाचे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज अनंतात विलीन झाले.
मृत्यूसमयी बायका मुलेही त्यांच्या सोबत नव्हती. दोन बायका व दोन मुले पन्हाळगडावर होते तर दोघीजणी विशाळगडावर होत्या. त्यांची अंतीम क्रिया सिंहगडावरच जीवाजीराजे भोसले वावीकर यांच्या हस्ते करण्यात आली. शिवाजीराजांच्या नित्यपूजेचा बाण राजाराम महाराजंकडेच होता. त्यांच्या दहनविधीच्या जागीच त्याची स्थापना करुन तिथे छत्री बांधण्यात आली.
 छ. राजाराम महाराजांचा वंश :
पत्नी :
१.      जानकीबाई (प्रतापराव गुजर यांची कन्या) : १५ मार्च १६८० रोजी विवाह : अपत्ये – मुलगी सोयराबाई उर्फ सावित्रीबाई (राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेल्या)
२.      ताराबाई (से. हंबीरराव मोहिते यांची कन्या) : विवाह १६८३, अपत्ये - पूत्र शिवाजी (जिंजीला जन्म - ९ जून १६९६ रोजी)
३.      राजसबाई (कागलकर घाटगे यांची कन्या) : विवाह : ---   अपत्ये – पूत्र संभाजी (पन्हाळ्यावर जन्म – २६ मे १६९८ रोजी)
४.      अंबिकाबाई उर्फ अहल्याबाई (खानविलकर) : (राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने त्या विशाळगडावर सती गेल्या)
{याशिवाय सगुनाबाई पासून अनौरस पूत्र राजा कर्ण व एक मुलगी होती असा उल्लेख आहे. ही मुलगी सूर्याजी पिसाळच्या मुलास दिली होती.}  
अष्टप्रधान मंडळ :
१.      निळो मोरेश्वर पिंगळे : पेशवा
२.      कृष्णाजी अनंत सभासद : मुतालिक
३.      प्रल्हादपंत निराजी : प्रतिनिधी
४.      सेनापती : संताजी घोरपडे / धनाजी जाधव
५.      जनार्दनपंत हणमंते : अमात्य
६.      रामचंद्रपंत : हुकमतपन्हा / अमात्य
७.      तिमाजी रघुनाथ हणमंते : प्रतिनिधी (प्रल्हादपंत वारल्यानंतर)
८.      शंकराजी मल्हार नरगुंदकर : सचिव (काही काळ)
९.      शंकराजी नारायण : सचिव (२३/१०/१६९०)
१०.  श्रीकराचार्य कालगांवकर : पंडित
११.  रामचंद्र त्रिंबक पुंडे : मंत्री
१२.  महादजी गदाधर : सुमंत
१३.  बाळाजी सोनदेव : न्यायाधीश
१४.  कोन्हेर जगन्नाथ : न्यायाधीश (बाळाजी सोनदेव नंतर)
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – ८
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा) 
Cont’d...
जसवंतसिंगाच्या मृत्यूनंतर जोधपूरचे राज्य खालसा करुन संपूर्ण राजपुतान्यावर कब्जा करण्याचा औरंगजेबाचा मनसुबा दुर्गादास राठोड वगैरे राजपुतांनी उडवून लावला. बादशहाचा मुलगा शहजादा अकबरला शहनशहा होण्यास मदत करु अशी हमी देवून राजपुतांनी त्याला आपल्याकडे ओढले. १ जानेवारी १६८१ रोजी शहजादा अकबरने स्वत:ला बादशहा घोषित केले आणि बापाविरुद्ध बंड पुकारला. चिडलेल्या औरंगजेबाने राजपूत अन अकबरामध्ये गैरसमज निर्माण करुन त्यांच्यात दुही निर्माण केली. शहजादा अकबर राजपुतान्यातून निसटून दक्षिणेकडे पळाला. दुर्गादास राठोड त्याच्यासोबत होता. स्वराज्यात आल्यावर दुर्गादास राठोडच्या मध्यस्थीने तो शंभूराजांना शरण आला. शेवटी हा कपटी औरंगजेबाचाच मुलगा, त्याच्यावर किती भरोसा ठेवायचा, या विचाराने शंभूराजांनी दोन तीन महिने त्याला खेळवत ठेवले पण संरक्षण दिले.  
शहजादा संभाजीला मिळाला तर आपली धडगत नाही हे औरंगजेब जाणत होता. बापाला मारून तो स्वत:च गादीवर बसला होता त्यामुळे चोराच्या मनात चांदणे चमकत होते. त्याने दक्षिणेकडे जाण्याच्या हालचालींना वेग दिला. स्वराज्याच्या आसपासची मुघल ठाणीही उत्तेजित झाली. स्वराज्याचे दक्षिणद्वार असलेल्या पन्हाळ्यावर जावून पुढची व्युहरचना ठरवायचा विचार शंभूराजांनी केला. रायगडाची सोय लावून ते पन्हाळगडावर गेले. तिथे वेगळेच नाट्य आकारात येत होते. सोयराबाईने चाल खेळून माफी पावलेल्या अण्णाजी, बाळाजी, हिरोजी फर्जंद, सोमाजी आदिंना हाताशी धरुन शहजादे अकबरला अर्धे राज्य देण्याचे अमिष दाखवले. संभाजीराजांना कायमचे संपवायचे या कटात शहजादा अकबरला सामील करून घ्या��चा त्यांनी प्रयत्न केला. रायगडावर बसून सोयराबाईने ही सर्व योजना आखली. सर्व बेत पक्का ठरल्यावर सन १६८१ च्या जूलै ऑगस्ट महिन्यात संभाजीराजांवर विषप्रयोग करण्यात आला!
ही कुणकुण शहजाद्याला आधीच लागली होती. संभाजीराजेंनी त्याला शरण दिले होते त्याला जागून त्याने बेईमानी केली नाही. गुप्तपणे भेट घेवून त्याने संभाजीराजांसमोर हा कट उघडकीस आणला. संभाजीराजेंनी जेवणाचे ताट मांजरीला खायला दिले आणि तात्काळ ती मांजर मेली. शहजाद्याने वेळीच सावध केल्यामुळे एक मोठा कट आमलात येवू शकला नाही. या प्रकाराचा धक्का बसलेल्या संभाजीराजांनी ऑगस्ट १६८१ मध्येच त्या कटात सामील असणार्‍या सर्वांना हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारले. छ. शिवाजीराजेंचे ते स्वामिनिष्ठ सेवक असले तरी त्या सर्वांनी खूप मोठा राजद्रोह केला होता. राजद्रोहाला देहदंड हीच योग्य शिक्षा होती. या घटनेने सोयराबाई हतबल अन एकाकी झाल्या. रायगडावर आपल्या महालात त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले.    
सप्टेंबर १६८१ मध्ये ६३ वर्षाच्या औरंगजेबने पाच लाख सैन्यानिशी अजमेरहून औरंगाबादकडे प्रयाण केल्याची खबर आली. संभाजीराजे त्याच्या सर्व हालचालीकडे लक्ष ठेवून होते. राज्यात चाललेल्या घडामोडी पाहून स्वत:ला कोंडून घेतलेल्या सोयराबाईंना आपल्या कुटील डावपेचाचा पश्चाताप होत होता. रयत त्यांना दोष देत होती. इकडे मुघलांना सामोरे जाण्याची स्वराज्यात जोरदार तयारी सुरू असतांनाच सोयराबाईने २७ ऑक्टोबर १६८१ रोजी विषप्राशन करुन आपले जीवन संपवले! एक मोठे महत्वाकांक्षी वादळ अशा रितीने शमले. त्याच दिवशी संध्याकाळी रोजी थोरल्या महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या जागेशेजारीच सोयराबाईंनाही मंत्राग्नी देण्यात आला.
१६८१ नोव्हेंबर मध्ये कुलाब्याच्या उंदेरी किल्ल्यावर झालेल्या लढाईत दादजी देशपांडेना हार मिळाली. त्यावेळी सिद्दी कासमने अनेक मराठ्यांची विटंबना केली. त्यावेळी औरंगजेब बुर्‍हाणपूरला होता. त्याने गोवेकर पोर्तुगीज आणि सिद्दी कासमला खलिते पाठवून मराठ्यांना कैंचीत पकडून कायमचे संपवायचा बेत आखला. औरंगजेबाचा पाठिंबा असल्यामुळे जंजिर्‍याचा सिद्दी अजून जोशात आला.  
उंदेरीवर घडलेल्या घटनेमुळे संतापलेल्या शंभूराजांनी २७ डिसेंबर १६८१ रोजी जंजिर्‍याची मोहिम हाती घेतली. सिद्दीला संपवल्याशिवाय औरंगजेबाचा दक्षिणेतील जोर कमजोर करता येणार नाही हे ते जाणून होते. मराठ्यांनी जंजिर्‍याला वेढा घातला. चारी बाजूने समुद्राचे खळाळते पाणी अंगावर झेलत एका खडकावर उभा असलेला जंजिरा हा अभेद्य किल्ला होता. शिवाजीमहाराजांनासुद्धा त्याचा पाडाव करणे शक्य झाले नव्ह��े. संभाजीराजेंनी समुद्री कार्यात निष्णात लोकांना मोहिमेत सामील करून घेतले होते तरी किल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नव्हते. जंजिर्‍याला वेढा घातला त्यावेळेसच एकीकडे त्यांनी दक्षिणेतील सर्व राजांनी औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र यावे यासाठी संधान बांधणे सुरु केले. मराठे जंजिर्‍यावर गुंतले आहेत ही संधी साधून हसनअलीखान हा औरंगजेबाचा सरदार नाशिक मार्गे कोकणात घुसत होता. तो कोकणात घुसायला यशस्वी ठरला तर रायगडाला धोका होता. त्यामुळे नाईलाजाने संभाजीराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून द्यावी लागली. जानेवारी १६८२ च्या अखेरीस संभाजीराजे रायगडावर गेले.    
२२ मार्च १६८२ ला औरंगजेब औरंगाबादला आला. दक्षिणेत मुघलांचे वर्चस्व धोक्यात आल्यामुळे त्याने मोठा फौजफाटा सोबत आणला होता. मराठेशाही आरामात संपुष्टात येईल ही औरंगजेबाची मनशा त्याच्या पहिल्याच योजनेत फोल ठरली. १६८२ च्या एप्रिल महिन्यात नाशिकजवळच्या रामशेज किल्ल्याला पहिल्या नमाजाला तोफ डागून दुसर्‍या नमाजाला किल्ला हस्तगत करतो असे म्हणून गेलेला सरदार फिरोजजंग, कासीमखान, शहाबुद्दीन यांना किल्लेदार सूर्याजी जेधे, रुपाजी भोसले, मानाजी मोरे पुरुन उरले. गडाच्या पायथ्याला मुघल सेना अडकून पडली. शहजादा अकबर जर संभाजी राजांशी हात मिळवणी करुन दिल्लीकडे निघाला तर त्याला रामशेजवरुनच जावे लागेल हे माहित असल्यामुळे औरंगजेबाला रामशेज ताब्यात घेणे आवश्यक वाटत होते. पण सहा महिने प्रयत्न करूनही रामशेज हाती येत नव्हता. हे पाहून शिवाजीनंतरही त्याचे राज्य जिंकणे वाटते तितके सोपे नाही याची कल्पना त्याला आली.  
दरम्यान १६ मे १६८२ रोजी माणगाव येथे येसुबाईंच्या पोटी शाहूचा जन्म झाला. त्याचे पाळण्यातले नाव आजोबांच्या नावावरुन शिवाजी ठेवण्यात आले होते. पण पुढे त्यांना शाहू या नावानेच संबोधले जावू लागले.
जून १६८२ मध्ये संभाजीराजेंनी कृष्णाजी कान्हेरेंना मैसूरच्या चिक्कदेवराजाला औरंगजेबाविरुद्ध आपल्या सोबत यावे ही विनवणी करण्यासाठी वकील म्हणून पाठवले. पण चिक्कदेवराजाने प्रस्ताव फेटाळला. तो स्वत:ला छत्रपतींपेक्षा श्रेष्ठ समजत होता. गोडीगुलाबीने तो राजी होत नाही हे पाहून संभाजीराजे स्वत: दहा हजार फौजेनिशी १६८२ च्या भर पावसाळ्यात मैसूरवर आक्रमण करण्यासाठी रवाना झाले. काकाश्री एकोजीराजेंच्या साथीने चिक्कदेवराजाची चारी बाजूने कोंडी केली. काकुळतीला आलेल्या चिक्कदेवराजाने शेवटी ऑक्टोबर १६८२ मध्ये संभाजीराजांसोबत एक कोटी होनाची खंडणी देवून शस्त्रसंधीचा तह केला आणि औरंगजेबाच्या लढाईसाठी दक्षिणेतून रसद पुरवण्याचे कबूल केले. मुघलांसोबत होणार्‍या युद्धासाठी हा तह महत्वाचा होता.
सन १६८३ च्या सुरूवातीला मुंब्र्याज���ळ असलेला पोर्तुगीजांचा पारसिक किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. पोर्तुगीजांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होवू शकले नाहीत. १६८३ च्या मध्यात किल्ल्याची डागडुजी करुन भक्कम करण्यात आले. पोर्तुगीज मुघलांना मिळाले तर या किल्ल्याचा चांगला उपयोग होणार होता. त्याचवेळी एकीकडे हंबीरराव मोहित्यांनी कल्याणवर घणाघाती हल्ला करुन रणमस्तखान व रहुल्लाखानाला जेरीस आणले होते. यात हंबीरराव जायबंदी झाले.
इकडे रामशेजला तुंबळ युद्ध चालले होते. पण गड ताब्यात येत नव्हता. मुघलांनी पाडलेला बुरुज मावळ्यांनी रातोरात बांधला होता. अवघ्या सहा महिन्यात सारा मुलुख पादाक्रांत करु ही औरंगजेबाची मिजाशी पूर्णपणे उतरली. महिन्यावर महिने उलटत होते, पण हाती काही लागत नव्हते. संतापलेल्या औरंगजेबाने वेरुळच्या लेणीचे अतोनात नुकसान केले.
१५ मार्च १६८० रोजी राजारामाचा विवाह प्रतापराव गुजर यांच्या जानकीबाई या मुलीशी छ. शिवाजी महाराजांनी लावून दिला होता. पण या लग्नाला सोयराबाईच्या आकसबुद्धीमुळे संभाजीराजांना बोलाविले नव्हते. आपल्या प्रिय लहान भावाचे लग्न आपल्यासमोर लागावे अशी संभाजीराजांची इच्छा होती. १६८३ मध्ये त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची आठ वर्षाची मुलगी ताराबाईसोबत राजारामाचा विवाह लावून आपली इच्छा पूर्ण केली. हा विवाह सोहळा पन्हाळगडावर पार पडला. ताराबाईचे नाव बदलून सीताबाई ठेवण्यात आले होते. पण ते प्रचलित झाले नाही. ताराबाई हेच नाव सर्वमुखी राहिले.  
ऑक्टोबर १६८३ मध्ये पोर्तुगीजांनी फोंड्याला मराठ्यांकडून शिकस्त खाल्ली. २५ नोव्हेंबर १६८३ ला पोर्तुगीज व्हाइसरॉय आल्व्होर मराठ्यांच्या गोव्यावरील आक्रमकाला भिऊन पळाला. पोर्तुगीजांची खोड मोडली होती. डिसेंबर १६८३ मध्ये जूवे बेटावरील सांत इस्तेव्हांचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पण शहजादा मुअज्जम आणि शहाबुद्दीनखान दक्षिण कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना अवघ्या तेवीस दिवसात हा गड सोडावा लागला. १० जानेवारी १६८४ ला शंभूराजांनी रायगडाकडे कुच केली.
सिद्दी आणि पोर्तुगीजांमध्ये संभाजीराजे गुंतल्याचा फायदा औरंगजेबाने घेतला. शहाबुद्दीनने स्वराज्यात धुमाकुळ घालून रायगडाजवळचे गंगोली गाव जाळले. संभाजीराजांच्या पुढे रायगडाकडे परतणार्‍या कवी कलशांनी बहादुरी दाखवली आणि गेले चारपाच दिवस लुटमार करणार्‍या मुघलांची प्रचंड कापाकापी केली आणि त्यांनी केलेली प्रचंड लूट अन रसद परत मिळवली. मुघलांची मजल रायगडपर्यंत पोहोचली ही गोष्ट संभाजीराजेंना जिव्हारी लागली. शहाबुद्दीनला फितूर झालेले राहुजी सोमनाथ, गंगाधरपंत, वासुदेवपंत आणि मानाजी मोरेंना कैद केले गेले.
मराठ्यांना वश करणे कठिण आहे हे लक्षात येवून औरंगजेबाने ३० ऑक्टोबर १६८४ ला विजापूरवर हमला केला. कुतुबशहा व संभाजीराजेंनी अदिलशहाला मदत क���ली. पण काही उपयोग झाला नाही. २६ सप्टेंबर १६८६ रोजी औरंगजेबाने विजापूर काबीज केले. अदिलशाही नष्ट झाली. त्यानंतर वर्षभरातच २१ सप्टेंबर १६८७ ला गोवळकोंडा पडला अन कुतुबशाहीपण संपुष्टात आली. दोन्ही शाह्या मुघलांना जोडल्या गेल्या. पण औरंगजेबाला खंत होती ती स्वराज्याची. अवघ्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा चिमुरडा संभा त्याच्या हाती लागत नव्हता यामुळे तो चिडला होता.
१६८६-८७ साली भयंकर दुष्काळ पडला होता. जिंजीने रसद पुरवून स्वराज्याची राखण केली होती. संभाजीराजे या काळात पन्हाळा आणि विशाळगडावर जास्त काळ असायचे. १६८७ लाच रुस्तुमखानाने वाईला घेरा घातला. चवताळून गेलेल्या सरनौबत हंबीररावांनी तरुणांनाही लाजवेल अशी चढाई करुन त्याला पिटाळून लावले. पण अचानक आलेल्या एका तोफगोळ्याने सत्तावन्न वर्षाच्या हंबीररावांचे प्राण घेतले. राजांना ते दु:ख खूप मनाला लागले होते. औरंगजेबाच्या निर्णायक लढाईत आता सरसेनापती हंबीरराव दिसणार नव्हते! रायगडावर ही बातमी पोहोचली. वडलांच्या मृत्यूची बातमी ऐकून ताराबाईंना अतिशय वाईट वाटले.
१६८८ साली औरंगजेबाने परत नव्या दमाने मराठ्यांवर आपली वक्र दृष्टी वळवली. औरंगजेबाचा हा झपाटा पाहुन शंभूराजांच्या रक्षणात असलेला शहजादा अकबर घाबराला. आता आपली काही धडगत नाही या भीतीने संधी साधून सन १६८८ सालीच एक दिवस तो इराणला पळून गेला. याच साली मुकर्रबखान पन्हाळा आणि विशाळगडावर उतरला. मराठ्यांनी त्याची डाळ शिजू दिली नाही. पण फितूरी आणि स्वकियांची गद्दारी जशी शिवाजी महाराजांना नडली तशीच संभाजीराजांनाही घातक ठरली. स्वकियांची ही फितूरी नसती तर आज इतिहास काही वेगळाच दिसला असता! संभाजीराजांचा सख्खा साला गणोजी शिर्के वतनासाठी औरंगजेबाला मिळाला. सह्याद्रीच्या खाणाखूणा माहित असलेला हा गद्दार मुघलांसाठी वरदान ठरला.
घात : पन्हाळ्यावर चोख व्यवस्था करुन आणि विशाळगडाच्या बुरुजाला भक्कम करण्याचे आदेश देवून संभाजीराजे आणि कवी कलश दोन हजार सैन्यासह जानेवारी १६८९ मध्ये पुढच्या सल्लामसलतीसाठी संगमेश्वरच्या वाड्यात गेले. महाराणी येसूबाई, खंडो बल्लाळ, धनाजी – संताजी – मानाजी, सेनापती म्हाळोजी घोरपडे आदी सर्वांनी त्यांचे स्वागत केले. हारकार्‍याने संगमेश्वरला राहणे धोक्याचे आहे ही खबर दिली. सैन्य विशाळगड आणि पन्हाळ्यावर गुंतले होते. मुकर्रबखान कोल्हापूरजवळ डेरा टाकून बसला होता. पण संगमेश्वर सारख्या अवघड जंगली आणि घाट वळणात कुणी उतरु शकणार नाही याची शंभूराजांना खात्री होती.
इथेच गफलत झाली. राजांनी सैन्याच्या काही तुकड्या घाटावर पाठवल्या. येसूबाईंना आठशे स्वारांसोबत रायगडाकडे रवाना केले आणि संताजी, धनाजी, खंडो बल्लाळसह मोजक्या चार पाचशे घोडेस्वारांना सोबत ��ेऊन राजे पुढची योजना आखण्यात मश्गुल झाले. रायगडा भोवती मुघल सेना जमली होती. तिकडे कुच करण्याचा बेत ठरला होता. याचवेळी गद्दार गणोजी शिर्केने हारकार्‍या मार्फत सर्व माहिती मिळवली होती. मुकर्रबखानाला त्याने ती पुरवली आणि खानाच्या पाच हजार सैन्याने १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वराला घेरा घातला.
तुंबळ लढाई सुरु झाली. सत्तरीच्या वयातले सेनापती म्हाळोजी घोरपडे राजाला वाचवता वाचवता स्वत: पडले. बापाचा बदला घेण्यासाठी संताजी, बहिर्जी, मालोजी सरसावले. त्यांना धनाजीने जोड दिली. बाका प्रसंग होता. एकाच जागी सर्वजण थांबणे धोक्याचे होते हे हेरुन संभाजी राजेंनी संताजी, धनाजी, खंडो बल्लाळ आणि इतर जवान स्वारांना चिपळूनच्या दिशेने खाशा स्वारीच्या रक्षणास पाठवले. काही युक्ती करुन आपणही सामील होवू असे सांगितले. इच्छा नसूनही राजांच्या आज्ञेला मान देऊन स्वार तिथून निघाले. शंभूराजे आणि कवी कलश घोडे दामटत तिथून निसटले. नावडी बंदरात सरदेसायाच्या वाड्यात वेषांतर करुन पुढे जायचा बेत आखला. पण दुर्दैव! गणोजीने माग काढला आणि मुकर्रबखानाला तिकडे घेवून आला. वैर्‍याने डाव साधला. असंख्य पठाणांच्या वेढ्यात स्वराज्याचा रखवाला शूरवीर शंभूराजा १ फेब्रुवावी १६८९ रोजी सायंकाळी कैद झाला!
गेल्या आठ नऊ वर्षापासून रामशेच काय, स्वराज्याची एक इंचही जमीन बळकाऊ न शकणार्‍या औरंग्याला फितूर गद्दार स्वकियांनी स्वराज्याचा वालीच सुपूर्द केला! जे युद्धाने शक्य झाले नाही ते कपटाने साध्य झाले.
इकडे चिपळूनचे ठाणे राखायला आलेला संताजीने येसूबाईचे पथक रायगडाकडे रवाना केले. राजे युक्तीने रायगडावरच येणार आहेत हे सांगितले. त्यांचे मेणे रवाना झाले अन त्याच वेळी हारकार्‍यांकडून  बातमी समजली की वैर्‍यांनी घात केला. राजे कैद झाले! तात्काळ संताजी पाच सहाशी घोडेस्वारासह परत संगमेश्वरला गेला. तिथे अशीच बातमी ऐकून धनाजीही आला होता. राजांना कैद झालेली ऐकून दोघांनाही अश्रू आवरणे कठिण झाले. राजधानी राखली पाहिजे या उद्देशाने तात्काळ त्यांनी रायगडाकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मृत बापाचा, म्हाळोजीचा अंत्यसंस्कार करायलाही संताजी थांबला नाही!  
१० फेब्रुवारी १६८९ च्या आसपास संभाजीराजांना दौंड जवळ पेडगावच्या बहादूरगडावर बंदिस्त करण्यात आले. राजांच्या सख्ख्या बहिणीचा -  सखूबाईचा नवरा, महादजी निंबाळकर बहादूरगडचा ठाणेदार होता. संभाजीराजे अन कवी कलशाची उंटावर बसवून धिंड काढण्यात आली. या धिंडीचे नियोजन महादजी निंबाळकरने केले. स्वराज्याचे हेच तर दुर्दैव!
जडजवाहीरात कुठे आहेत, कोण कोण मुघलांना फितूर झालेले सरदार आहेत असे अनेक प्रश्न विचारुन राजांचे हाल करण्यात आले. कवी कलशालाही फोडायचा प्रयत्न केला. पण तो सच्चा दोस्त नमला नाही. उलट त्याने औरंगजेबाला विनंती क���ली की माझे काय हाल करायचे ते कर पण शंभूराजांना राजासारखे वागव. पण तो निर्दयी पातशहा द्रवला नाही.
3 मार्च १६८९ ला औरंगजेबाने कोरेगाव भीमा आणि तुळापूरच्या मध्ये छावणी हलवली. सर्व प्रयत्न करुन औरंगजेब थकला. शंभूराजांना मुस्लिम धर्म स्विकारण्याची बळजबरी करण्यात आली. राजे वधले नाहीत. शंभूराजांचा आणि कवी कलशचा आतोनात छळ केला गेला. औरंगजेबाच्या तोंडावर थुंकणार्‍या कलशाची जीभ कापली गेली. त्या नराधमाने दोघांच्या अंगावरची कातडी सोलायला लावली, नखे उपटायला लावली, राजांच्या डोळ्यात तप्त सळ्या खुपसल्या. रक्तामासाचा चर्रर्र आवाज झाला, पण शंभूराजांच्या मुखातून ‘आह’ सुद्धा  निघाला नाही! औरंगजेबाला वाटले होते की एवढा छळ केल्यावर तरी शंभूराजे शरणागती मागतील, पण त्या क्रूर पातशहाची ही अपेक्षाही फोल ठरली.
अंत:काळ : शंभूराजे आणि कलशाचे रक्तामासांने बरबटलेले अस्थिपंजर देह केवळ श्वास चालू होता म्हणून जीवंत होते. सर्व प्रकारचे अघोरी छळ करुन झाल्यावर त्या नराधम औरंग्याने ११ मार्च १६८९ रोजी दोघांनाही संपवण्याचा हुकूम दिला. सकाळी आधी कवी कलशाच्या शरीराचे तुकडे करुन भीमेच्या काठावर फेकून देण्यात गेले. डोळ्यांच्या खाचा झालेल्या असल्या तरी अंतर्मनाच्या संवेदनेतून संभाजीराजेंनी प्रिय मित्र कलशाला निरोप दिला. तशा परिस्थितीतही शंभूराजांच्या चेहर्‍यावर मिस्किल हास्य होते. त्या हास्याचीच धास्ती औरंग्याने घेतली होती. त्याच दिवशी संध्याकाळी त्याने ते हास्य कायमचे मिटवण्याचा हुकूम दिला. अन त्याबरोबर तुळापूर व वढूच्या मधून वहाणार्‍या भीमेच्या तीरावर मावळतीच्या सूर्याची नव्हे तर रक्तामासाची लाली पसरली. किनार्‍यावरचा तो लाल चिखल पाहून शांतपणे वाहणार्‍या भीमेलाही उचंबळून येत होते. स्वराज्यातील कण अन कण याप्रसंगी हतबल झाले होते. कुणीच काही करु शकले नव्हते. अवघ्या बत्तीसाव्या वर्षी शिवाजीराजांचा हा छावा अनंतात विलीन झाला...
११ मार्च १६८९ हा दिवस शिवछत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या इतिहासातला एक महाभयंकर काळा दिवस ठरला...  
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌----------------------------------------------------
छत्रपती संभाजीराजांचा वंश :
पत्नी :
1. येसुबाई (जीऊबाई - शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांची कन्या, गणोजी शिर्केची बहीण) : १६६६ मध्ये शंभूराजांशी लग्न. अपत्ये : भवानीबाई, शाहू
(दुर्गाबाईपासून मदनसिंग नावाचा मुलगा होता अशी काही इतिहास संशोधकांच्या पुस्तकात नोंद आहे)
संभाजीराजांचे अष्टप्रधान मंडळ :
1. पंतप्रधान (पेशवा) : निळोपंत पिंगळे
2. अमात्य (मुज��मदार) : अण्णाजी दत्तो
3. सचिव (चिटणीस) : बाळाजी आवजी
4. मंत्री (सुरनीस) : आबाजी सोनदेव
5. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते, म्हाळोजी घोरपडे
6. सुमंत (डबीर) : जनार्दनपंत
7. न्यायाधीश : प्रल्हाद निराजी
8. पंडीतराव दानाध्यक्ष : मोरेश्वर पंडीत
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – ७
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
छत्रपती संभाजीराजे : (१४ मे १६५७ ते ११ मार्च १६८९)
१४ मे १६५७ रोजी सईबाईंच्या पोटी संभाजीराजांचा जन्म किल्ले पुरंदर इथे झाला. त्यांच्या जन्मानंतर दोनच वर्षांनी ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाईंचे दिर्घ आजाराने निधन झाले. आईच्या माघारी जिजाबाईंनी संभाजीराजांचा सांभाळ केला. केशवभट या गुरुंच्या देखरेखीत शंभूराजे युद्धकला, धनुर्विद्या, कला व इतर शास्त्रात निपूण झाले. वयाच्या आठव्या वर्षी मु��ल बादशहाची पंचहजारी मनसब, आग्रा भेट, बादशहाचा दरबार, मोघलांचे ऐश्वर्य, आग्र्यातून सुटका, या सर्व घटनेचा प्राभाव बालवयापासून त्यांच्या मनावार उमटला होता. यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले.  
६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी संभाजी राजांचा युवराज म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. सावत्र आई सोयराबाईंना महाराणी होण्याचा मान मिळाला. त्यातून त्यांना त्यांचा पुत्र राजारामास युवराजपद मिळावे ही अभिलाषा निर्माण झाली. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी १८ जून १६७४ रोजी जिजाऊंचे देहावसान झाले आणि संभाजीराजेंचा मोठा आधार गेला. संभाजी स्वतंत्र वृत्तीचे होते. राज्यकारभारात गुंतलेल्या शिवाजी राजांना संभा��ीकडे लक्ष द्यायला फुरसत नसायची. जिजाऊंचा आधार गेल्यामुळे संभाजींचा स्वभाव चिडखोर अन तापट बनत गेला. याचा फायदा घेण्यासाठी महत्वाकांक्षी सोयराबाईने ज्येष्ठ प्रधान अण्णाजी दत्तोंना हाताशी धरुन संभाजीराजींना बदनाम करुन राजकारण खेळण्यास सुरुवात केली. इथेच खर्‍या अर्थाने गृहकलहाला सुरुवात झाली.
या काळात बर्‍याच घडामोडी घडल्या. शृंगारपूरची सुभेदारी, कलशाभिषेक, दिलेरखानाला मिळणे हे सर्व झाले. पण कुठेतरी संभाजीराजेंचे मन खात होते. एवढे मोठे स्वराज्य आपल्या वडीलांनी शुन्यातून उभे केले, आणि आपण हे काय करत आहोत? या भावनेतून ते परत स्वराज्याच्या सेवेत आले. पितापुत्रांची दिलजमाई झाली. पण त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करण्यात सोयराबाईंनी काही कसर बाकी ठेवली नाही.
३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी राजे आकस्मात गेले. औरंगजेबाला धडा शिकवायचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. राज्यातील जनतेच्या दु:खाला सीमाच राहिल्या नाहीत. लहान थोरांपासून सर्वांच्या डोळ्यातील पाणी कितीतरी दिवस  वहायचे थांबले नाही. आता खरा पेच निर्माण झाला होता- पुढचे छत्रपती कोण?
त्यावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. रायगडावर जाऊन त्यांना साडेतीन वर्ष झाली होती. शिवाजीराजांच्या आजारपणाची बातमी त्यांना देण्यात आली नव्हती. परमप्रिय आबासाहेब गेल्याची त्यांना काहीच खबर नव्हती. हे डावपेच रचण्यात सोयराबाईंना यश आले होते. पण पुतळाबाई मार्फत आलेल्या हारकार्‍याने ही खबर शंभूराजापर्यंत पोहोचवली. रायगडावरचे राजकारण समजले. आबासाहेब गेल्याचे प्रचंड दु:ख शंभूराजांना झाले, त्याहीपेक्षा रायगडावरच्या कटकारस्थानामुळे ते अत्यंत व्यथित झाले.
सोयराबाईने ही संधी साधून अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, प्रल्हाद निराजी, बाळाजी, आवजी अशा काही मोजक्या विश्वासू लोकांना हाताशी धरून संभाजी राजांना कैद करायची योजना आखली होती. राजारामांना गा��ीवर बसवायचे त्यांचे स्वप्न फळाला येण्याची वेळ आली होती. पन्हाळगडाचे किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, बहिर्जी इंगळा, सोमाजी, कृष्णाजी, हिरोजी फर्जंद, आदी फितूर झाले होते. संभाजीराजांना वेळीच ही खबर लागली. कटात सामील असणार्‍या या सर्वांचा पन्हाळ्यावर योग्य तो बंदोबस्त करण्यात आला. ही खबर सोयराबाईंना नव्हती.
सर्व साधले या विचारात अक्षय तृतियाचा मुहुर्त साधून रायगडावर कडक बंदोबस्तात २१ एप्रिल १६८० रोजी त्यांनी घाईघाईने राजारामांचा त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी मंचकारोहणाचा कार्यक्रम उरकला  आणि त्यांना छत्रपती घोषित केले. सर्व सूत्रे सोयराबाईंनी हातात घेतली. रायगडावर कडक पहारा ठेवण्यात आला. छत्रपतींना जाऊन पुरता एक महिनाही झाला नव्हता आणि इकडे हे कारस्थान चालले होते. शंभूराजांचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी सुरनीस, पेशवे, न्यायाधीश ही मंडळी, काही खुशीने तर काही नाईलाजाने, मोठ्या फौजफाटेसह कुच करुन पन्हाळगडावर चालून गेले. कराडजवळ असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते आपणांस मदत करतील अशी सर्वांची अपेक्षा होती. पण त्यांचा मनसुबा हंबीरराव मोहिते यांनी हाणून पाडला. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईचे भाऊ म्हणजेच राजारामाचे सख्खे मामा असूनही त्यांना मोठे वारस असतांना धाकट्याला गादीवर बसवणे मंजूर नव्हते. यामुळे सोयराबाईंच्या गोटातील सर्व मंडळी व्यथित झाली. हंबीरराव खंबीर राहिल्यामुळे त्यांचे प्रयत्न विफल झाले. पन्हाळ्यावर चालून आलेल्या या सर्व प्रधानांना पन्हाळ गडावर बंदिस्त करण्यात आले.
छ. शिवाजी महाराज जाऊन दोन महिने होत आले होते. आता योग्य ती हालचाल करणे आवश्यक होते. पन्हाळगडावर चोख बंदोबस्त बसवून शंभूराजांनी रायगडाकडे कुच केले. पाचाडच्या वेशीवर त्यांचे सासरे पिलाजी शिर्केंनी त्यांचे स्वागत केले. सर्व बंडांचा बिमोड करुन संभाजीराजे १८ जून १६८० रोजी हंबीरराव मोहित्यांसह रायगडावर दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी छत्रपतींच्या सिंहासनाचे दर्शन घेतले. अगदी हुबेहूब थोरल्या राजांप्रमाणे भारदस्त दिसणार्‍या शंभूराजेंना पाहुन दिलेरला मिळालेले हेच ते युवराज हा विचार खचाखच भरलेल्या दरबारात कुणाच्या मनालाही शिवला नाही. राजारामाचा मंचकारोहन झालेला असला तरी सोयराबाई व काही निवडक मंडळी सोडली तर त्याला रयतेची मान्यता नव्हती. रायगडावर  संभाजीराजांच्या आगमनाने रयत खूश झाली होती.  
गडावर हालचाली तेज झाल्या. सोयराबाईवर नजरकैद बसवली गेली. बाल राजारामांना हाताशी धरुन कुणी दगा करु नये म्हणून त्यांच्यावरही नजरबंदी झाली. कुणावरच विश्वास राहिला नव्हता. म्हणून शंभूराजांनी स्वत: जातीने सर्व खजीना तपासला. आपसातल्या कलहामुळे स्वराज्याची घडी विस्कटली होती. ती पूर्ववत करणे हे सर्वात महत्वाचे काम होते.
थोरले राजे जाऊन अडीच महिने होवून गेले होते, पण त्यांचे अंत्यकर्म झालेले नव्हते. गडावर येण्यापूर्वी पाचाडला पुतळाबाईंच्या भेटीत ही माहिती शंभूराजांना समजली होती. २७ जून १६८० रोजी छत्रपती शिवाजीराजांचा विधीवत अंत्यसंस्कार, त्यांची काष्ठाची मूर्ती करुन, मंत्राग्नीने करण्यात आला. त्याच दिवशी पुतळा मांसाहेब सती गेल्या! आजी जिजाऊनंतर आईप्रमाणे प्रेम देणारी ही माता शंभूराजांच्या आगमनाचीच वाट पहात होती. शंभूराजे गडावर आले आणि त्यांनी आपली इच्छा पूर्णत्वास नेली. शंभूराजे परत एकदा पोरके झाले!
या दु:खातून सावरुन जुन्या जाणत्या शिलेदारांच्या सल्लामसलतीने २० जूलै १६८० रोजी शंभूराजांनी मंचकारोहण करुन घेतले. खोळंबलेली राजकीय घडी हळुहळू पूर्ववत बसू लागली. कटात नाईलाजाने सामील झालेल्या प्रल्हाद निराजींना मुक्त करुन परत न्यायधीश पद देण्यात आले.
औरंगजेब कधीही दक्षिणेत उतरु शकतो याच्या खबरा मिळू लागल्या. त्यामुळे फौजफाटा वाढवण्याच्या मुख्य कामाला गती देणे सुरु झाले. त्यासाठी लागणार्‍या संपत्तीचे गठण करण्यासाठी वेगवेगळ्या सरदारांना खानदेश, कर्नाटक, गोवा आदी भागात धाडण्यात आले. पन्हाळ्यावरील बंदिस्तांना रायगडावर आणून कोठडी देण्यात आली. १६८० च्या ऑक्टोबर महिन्यात कोठडीतच पेशवा मोरोपंत  जरजर होवून निवर्तले. पेशावाईचे वस्त्र त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे सुपूर्द करण्यात आले.
औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीमुळे प्रसंग असा बाका आला होता की राज्य चालवण्यासाठी अनुभवी लोकांची आवश्यकता होती. शंभूराजांनी आपल्या विश्वासू लोकांच्या सल्ल्याने रायगडावर बंदिवासात असलेल्या अष्टप्रधान मंडळांना मुक्त करुन त्यांना त्यांचे जूने काम परत सोपवले. अण्णाजी, बाळाजी, आवजी आदी लोकं त्यांच्या मूळ कामाला लागले. कवी कलशांना शंभूराजांनी आपला खास सल्लागर नेमले.
कवी कलश : प्रयाग येथील मुरलीधर शास्त्री यांचा मुलगा उमाजी पंडीत, म्हणजेच कवी कलश. हे शास्त्री घराणे भोसले घराण्याचे प्रयागमधील वंशपरंपरागत उपाध्याय होते. संस्कृत पंडीत असलेले उमाजी  ब्रजभाषेतील उत्कृष्ट कवी होते. संस्कृत आणि ब्रजभाषा यावर त्यांचा चांगलाच पगडा होता. त्यांच्या कवीतांमुळेच त्यांना कवीतेतील कळस म्हणजेच कलश म्हटले जायचे. तेव्हापासून उमाजी पंडीत कवी कलश या नावानेच ओळखले जावू लागले. शिवाजी महाराज बाल संभाजीसह आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांच्या सेवेसाठी मुरलीधर शास्त्रीने कवी कलशास पाठवले होते. शिवाजीराजे आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा कवी कलश आग्र्यात थांबून हेरगीरी करत होते. तिथून ते मथुरेस आले. बाल संभाजी मथुरेसच होते. आग्रा प्रकरण निवळल्यानंतर बाल संभाजी सोबतच कवी कलश रायगडावर आले. तेव्हापासून ते संभाजीराजांसोबतच राहू लागले. वयाने दहा वर्षे मोठे असलेल्या संस्कृत पंडीत कवी कलशांच्या स��बत राहूनच संभाजीराजांना बालपणापासून साहित्याची आवड निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांनी वयाच्या चौदा पंधराव्या वर्षीच बुद्धभूषणम, नायिकाभेद, नखशिखा, सातशतक आदी पुस्तके संस्कृतमधून लिहिली. लहानपणापासून एकटेपणात वाढलेल्या शंभूराजांना कवी कलशांची चांगली साथ लाभली. कवी कलशांनीही शंभूराजांची  सावली बनून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली.  
राज्याभिषेक : संभाजी राजांचे मंचकारोहण झाले होते पण ते अधिकृत छत्रपती झाले नव्हते. गादी रिकामी ठेवणे घातक होते. सर्वानुमते त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा १६ जानेवारी १६८१ रोजी असंख्य  लोकांच्या साक्षीने पार पडला. स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले अन विस्कटलेल्या स्वराज्याची घोडदौड जोमाने सुरु झाली. गड किल्ले तसेच रयतेचा व सैन्याचा विश्वास मजबूत करण्यासाठी दौलत जमा करणे आवश्यक होते. त्याची तयारी सुरु झाली.    
औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी मराठी फौजेनी सुरतेत घुसायची हुल उठवली. मुघल सेना सुरतेच्या बंदोबस्तात गुंतली. ठरल्याप्रमाणे घडत होते. ३० जनेवारी १६८१ ते २ फेब्रुवारी १६८१ दरम्यान  संभाजी राजांनी मुघलांचे संपन्न असे दक्षिण द्वार बुर्‍हाणपूर लुटून त्याचे विराणपूर केले, आणि करोडोच्या दौलतीसह ते रायगडावर परत आले. त्याच वेळी नाशिक, बागलाण, मराठवाड्यात मावळ्यांनी धुडघूस घातली. या कार्यात चांगले काम करणार्‍या जुन्याजाणत्यां लोकांसोबतच नव्या दमाचे रुपाजी, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, निळोपंत, कृष्णाजी कंक आदींचा सत्कार करण्यात आला. यातून सर्वांना नवा हुरूप आला.    
छत्रपती झाल्या दिवसापासून राजे संभाजींना उसंतच मिळाली नाही. औरंगजेब पाच लाख सैन्यासह दक्षिणेकडे निघाला होता. स्वराज्याचा बिमोड करुन कन्याकुमारी ते काबुल मुघलशाहीत सामील करून घ्यावे असे त्याच्या मनात होते. शिवाजी महाराज गेल्यामुळे आता मराठेशाहीत कुणी आपला विरोध करु शकणार नाही या भ्रमात तो मजल दरमजल करत निघाला होता.
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
श्रीमंत.....भाग – ६
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
     स्वराज्य रक्षण आणि स्वराज्याचा विस्तार या धामधुमीसोबतच शिवाजीराजांना सतत गृहकलहाचा सामना करावा लागत होता. काही नाराज प्रधान मंडळी आणि सोयराबाईने राजारामाला युवराज करण्यासाठी शंभूराजांच्या बदनामीचे कारस्थान सुरु केले होते. आईविना वाढलेल्या आणि आजीच्या लाडाने मोठा झालेल्या शंभूराजांवर कुठल्या न कुठल्या कारणाने होत असलेल्या आरोपांच्या बातम्यानी शिवाजीराजांचे मन विषन्न व्हायचे. दिवस रात्र राजकारणात आणि स्वराज्याच्या विकास अन विस्तारात व्यस्त असलेल्या महाराजांना नाही म्हटले तरी या सर्व कारस्थानाचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळेच वाद नकोत म्हणून कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वी महाराजांनी युवराज संभाजींना शृंगारपूरची सुभेदारी दिली होती.
     शृंगारपुरात संभाजी राजांनी करातून सूट देऊन रयतेला खूश केले होते. पण यामुळे स्वराज्याच्या संपत्तीवर बोजा पडला असा कांगावा करण्यात आला. यावर अ���्टप्रधान मंडळ नाखूश होते. काहीही केले तरी आपल्याविरुद्धची कटकारस्थाने कमी होत नाहीत, कसलेही आरोप लावले जात आहेत, हे पाहून संभाजीराजे खजील झाले. अशा मनोकल्पित आरोपांमुळे आबासाहेब आपल्याला कठोर शिक्षा करतील याची त्यांना चिंता वाटू लागली. संभाजीराजेंची मन:स्थिती पाहून कविकलशांनी संभाजीराजांना कलशाभिषेक करुन घेण्याचा सल्ला दिला. कलशाभिषेक झाल्यास ‘राजा’ ची मान्यता मिळते, तो शिक्षेस पात्र रहात नाही, हा यामागचा उद्देश होता. २३ मार्च १६७८ रोजी शंभूराजांचा कलशाभिषेक शृंगारपुरात पार पडला. या बातमीने शिवाजीराजांना खूप दु:ख झाले होते.  
     या अंतर्गत कलहाचा फायदा उचलण्यास शत्रू सज्जच होता. शंभूराजांच्या या मानसिक स्थितीला मित्रत्वाचा भावनिक हात पुढे करून दिलेरखानाने त्यांना सात हजारी मनसबदार करुन १३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलशाहीत सामील करुन घेतले! स्वराज्य निर्मात्याचा पुत्र स्वराज्याच्या शत्रूस मिळाला ही फार दुर्दैवी घटना होती.
शंभूराजे सामील झाल्याबरोबर दिलेरखानाने त्यांच्याच नेतृत्वाखाली २ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगडावर हल्ला केला. शंभूराजांना अग्रस्थानी पाहून, धन्याविरुद्ध कसे लढणार या विचाराने किल्लेदार फिरंगोजी नरसाळेंनी न लढताच किल्ला सोडला. किल्ला ताब्यात घेऊन सर्व मावळ्यांना सुरक्षित निघून जाऊ देण्याची संभाजीराजांनी दिलेरखानाला विनंती केली होती. पण नीच दिलेरखानाने तसे न करता शरण आलेल्या सर्व मावळ्यांचे एकेक हात तोडून टाकले. हे पाहून संभाजीराजे प्रचंड संतापले. दगाबाज दिलेरखानाशी दोस्ती केल्याचा त्यांना पस्तावा झाला. जवळजवळ वर्षभर शंभूराजे दिलेरखानासोबत होते, पण तो इतका क्रुर असेल असे त्यांना वाटले नव्हते. या घटनेनंतर काही दिवसांनीच शंभूराजांनी दिलेरखानाची साथ सोडली आणि २० नोव्हेंबर १६७९ रोजी स्वगृही परतून ते पन्हाळगडावर आले.
     या आणि अशा अनेक घरातल्या घटनांमुळे शिवाजीराजांना राजकारणापेक्षाही जास्त मानसिक त्रास होत होता. त्यात त्यांची तब्येत अधुनमधून बिघडू लागली. १३ जानेवारी १६८० रोजी त्यांनी पन्हाळ्याला जाऊन शंभूराजांची भेट घेवून त्यांची समजूत काढली. बापच मुलाची मानसिक स्थिती ओळखू शकतो. वडलांचा मायेचा हात डोक्यावरून फिरल्यावर शंभूराजे ढसढसा रडले. मनात दाटलेले सर्व मळभ दूर झाले. या छोट्याशा भेटीमुळे शंभूराजांचे जीवनच बदलले. आरोप, कुटील कारस्थाने यांना समर्थपणे तोंड देण्याची उर्जा त्यांना मिळाली. या उर्जेमुळेच पुढे मोठा इतिहास घडणार होता याची त्यावेळी या पिता पुत्रांनाही कल्पना नव्हती!
पन्हाळ्यावरून निघून शिवाजीराजेंनी रायगडावर परत जातांना ४ फेब्रुवारी १६८० रोजी सज्जनगडावर समर्थांची भेट घेतली. दोन दिवसाच्या तेथील वास्तव्यात मनात चाललेली घालमेल, चिंता नष्ट होवून तृप्त मनाने राजे रायगडावर परतले.    
     या काळात एकेक घटना पटापट घडत होत्या. प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी बरोबर १५ मार्च १६८० रोजी राजारामाचा विवाह संपन्न झाला. शंभूराजे या विवाहाला पोहोचू नयेत याची सर्व व्यवस्था सोयराबाईंनी केली होती. शंभूराजे स्वत:च आले नाहीत हे त्यांना भासवायचे होते. पण शिवाजीराजेंना या कपटी डावपेचाची चांगलीच जाणीव होती, केवळ मंगलकार्यात गालबोट नको म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. ही गोष्ट सोडली तर या घरगुती सोहळ्यामुळे शिवाजीराजांचे स्वास्थ्य थोडे ठिक झाले होते.
याच सुमारास एक मोठी बातमी येवून धडकली. हा शिवाजी कुणालाही वधणार नाही ही खात्री पटून स्वत: औरंगजेबाने दक्षिणेत उतरायचे ठरवले. कोणत्याही चढाईसाठी आजवर एकदाही स्वत: मैदानात न उतरणारा औरंगजेब, शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी मात्र अफाट मुघल सैन्यासह जातीने बाहेर पडला. शिवाजी महाराजांचे खरे यश तर हेच होते. पण...
     औरंगजेबाला समर्थपणे तोंड देवून त्याला नेस्तनाबुत करण्यासाठी महाराजांनी नव्या उमेदीने उभारी घेतली. ही उमेद पाहून मावळ्यांचे रक्त सळसळून उठले. काशी, मथुरा बाटवणार्‍या औरंगजेबाला धडा शिकवायची संधी वाया जावू द्यायची नाही या इर्षेने सर्वजण पेटून उठले. हिंदू देवस्थानांच्या विटंबनेचा बदला घेवू हा समर्थांना दिलेला शब्द पाळण्याची वेळ चालून आली होती. आपसातले मतभेद विसरून फितूर, गद्दारांना समजावून राजांनी आपलेसे करुन घेतले. मुस्लिम धर्म स्विकारुन मुघलांना मिळालेल्या जुन्या सहकार्‍यांना माफ करुन परत आपल्या धर्मात सामावून घेतले व अफाट अशा मुघल साम्राज्याचा पाडाव करण्यासाठी तितक्याच मोठ्या संख्येने सैन्य उभे केले.
     औरंगजेबाला सामोरे जाण्यासाठी मराठी सैन्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संभाजी राजांवर मोठी जवाबदारी सोपवण्याचे राजांचे स्वप्न नजरेच्या टप्प्यात आले होते. स्वराज्याच्या कानाकोपर्‍यात खलिते धाडून सर्व सुभेदारांना सज्ज करण्यात आले. हेरांमार्फत खबरा मिळवण्याची यंत्रणा उभी करण्यात आली. ही सर्व जैय्यत तयारी चालू होती, अन अगदी याच वेळी नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच चालले होते...
राजकारण, सततचे दौरे, गृहकलह, यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रासलेले छत्रपती शिवाजीमहाराज मार्च १६८० च्या शेवटी अंथरुणाला खिळले! रायगडावर राजवाड्यात रामचंद्र अमात्य, बाळाजीपंत चिटणीस, निळोपंत पिंगळे, रावजी सोमनाथ, गंगाधतपंत, हिरोजी फर्जंद आदी सर्वांच्या चेहर्‍यावर दु:खाची अवकळा पसरली. राजांच्या अंगातल्या ज्वराने अतिरेक केला. सतत आठ दिवस अथक प्रयत्न करुन थकलेल्या राजवैद्यांनी महाराजांची एकदा शेवटची नाडी तपासली आणि खिन्न मनाने होवून साश्रू नयनांनी ती दु:खद बातमी जाहीर केली!
३ एप्रिल १६८० रोजी, कठीण काळात अफाट कार्य करुन हिंदूपदपातशाहीचा अभेद्य इतिहास निर्माण करणार्‍या या महाराष्ट्राच्या धुरंदर छत्रपतींना नियतीने गिळंकृत केले! राजांचे वय त्यावेळी होते अवघे एकावन्न वर्ष!  
‘क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्मरक्षक, महाराजाधिराज, महाराज श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज’ अनंतात विलीन झाले...  
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌-------------------------------------------------------
छत्रपति शिवाजीमहाराजांचा वंश :
पत्नी :
1. सईबाई निंबाळकर (फलटण) : राजांशी लग्न १६ मे १६४०, अपत्ये – सखूबाई (निंबाळकर), राणूबाई (जाधव), अंबिकाबाई (महाडिक), संभाजी
2. सोयराबाई मोहिते (कर्‍हाड) : राजांशी लग्न एप्रिल १६४१, अपत्ये - दिपाबाई, राजाराम
3. पुतळाबाई पालकर (पैठण) : राजांशी लग्न एप्रिल १६५०, अपत्ये –
4. सगुणाबाई शिर्के (रत्नागिरी) : राजांशी लग्न एप्रिल १६५०, अपत्ये – राजकुंवरबाई (शिर्के)
5. लक्ष्मीबाई विचारे (पैठण) : राजांशी लग्न १६५६, अपत्ये –
6. सकवारबाई गायकवाड (पूणे) : राजांशी लग्न १० जाने १६५७, अपत्ये – कमळाबाई
7. काशीबाई जाधव (जालना – सिंदखेड) : राजांशी लग्न ८ एप्रिल १६५७, अपत्ये –
8. गुणवंताबाई इंगळे (कोल्हापूर) : राजांशी लग्न १५ एप्रिल १६५७, अपत्ये –  
शिवाजी राजांचे अष्टप्रधान मंडळ :
1. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
2. अमात्य (मुजुमदार) : रामचंद्र नीळकंठ
3. सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो
4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्र्यंबक
5. सेनापती (सरनौबत) : प्रतापराव गु��र, हंबीरराव मोहिते
6. सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक
7. न्यायाधीश : निराजीपंत रावजी
8. पंडीतराव दानाध्यक्ष : मोरेश्वर पंडीत
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
श्रीमंत.....भाग – ४
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
शिवाजी महाराजांचा कायमचा काटा काढण्यासाठी औरंगजेबाने दिलेरखानाला सोबत देऊन मिर्झाराजे जयसिंग यांना मोठ्या फौजेनिशी दक्षिणेत धाडले. एवढ्या मोठ्या फौजेसमोर आपले काही चालणार नाही हे राजांनी ताडले. प्रजेची हानी टाळण्यासाठी राजांनी ११ जून १६६५ रोजी जिव्हारी लागणारा पुरंदरचा तह केला आणि नाईलाजाने शंभूराजांना वयाच्या आठव्या वर्षी औरंगजेबाचे पाच हजारी मनसबदार म्हणून स्विकार केला. स्वराज्याचे २३ किल्ले औरंगजेबाला बहाल करावे लागले. शिवाजीराजेंनी मुघलांना एकनिष्ठ रहावे असे बंधन घालण्यात आले. या तहानंतर एक धक्कादायक घटना घडली. स्वराज्याचे भवितव्य संपले असे गृहित धरुन सरसेनापती नेताजी पालकर अदिअलशहाला मिळाले. राजांना याचे फार दु:ख झाले.  
आग्रा : १२ मे १६६६ ला आग्रा येथे होणार्‍या औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी मिर्झा राजेंनी राजांना औरंगजेबाच्या वतीने आमंत्रण दिले. शिवाजी मुघलांना एकनिष्ठ आहे हे सिद्ध करण्याची ही संधी मिर्झाराजांना घ्यायची होती. तहात हरलेल्या राजांना हे टाळणे अशक्य झाले. नाईलाजाने ते तयार झाले. शिवाजी महाराजांना आमंत्रित करण्यात औरंगजेबाचा हेतू होता की त्यांना बादशहाचे मांडलिक बनवून काबूल कंदहारला पाठवायचे अन तिकडेच अडकवायचे किंवा मारून टाकायचे. मिर्झा राजे जयसिंगनी राजांना शब्द दिला की त्यांच्या हयातीत असे काही घडणार नाही अन कुणी तुम्हाला धक्का लावू शकणार नाही. ही खात्री झाल्यावर शिवाजी महाराज तयार झाले. जिजाऊ व इतर सरदारांनी चिंता व्यक्त केली, पण शिवाजी महाराजांनी सर्वांना विश्वासात घेवून जायचा बेत ठरवला.
२२ जानेवारी १६६६ ला शहाजहानला आग्र्याच्या तुरुंगात औरंगजेबाने विषप्रयोग करुन मारले. बाप  जीवंत असेपर्यंत औरंगजेब दिल्लीतच होता. नंतर १५ फेब्रुवारी १६६६ पासून तो आग्र्याला आला. तेव्हापासून तो आग्र्याहुनच राज्य चालवू लागला.  
प्रत्यक्ष शत्रुच्या नगरीत बाल संभाजीला सोबत घेऊन जायची राजांची हिम्मत वाखाणण्याजोगी होती. स्वराज्याची जिम्मेदारी जिजाऊ आणि मोरोपंत पिंगळेंवर सोपवली अन आग्र्याला जाण्यासाठी ५ मार्च १६६६ ला राजांनी राजगड सोडला. सोबत निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव डबीर, रघुनाथ बल्लाळ, हिरोजी फर्जंद, बाजी सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, कवी परमानंद या मातब्बर साथीदारांसह साडेतीनशे निवडक सैन्य सोबत घेतले होते. प्रवासातील खर्चासाठी औरंगजेबाने एक लक्ष रूपये दिले होते अन गाझी बेगला प्रतिनिधी म्हणून सोबत दिले होते. मिर्झा राजेंनीही तेहसिंग कछवा यास महाराजांसोबत पाठवले होते.
राजगडहुन निघाल्यावर शिवाजी महाराज २० मार्चच्या आसपास औरंगाबादला आले. त्यांची ख्याती चोहिकडे पसरलेली होती. त्यामूळे त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. हजारो लोकांनी शहरात त्यांचे स्वागत केले. मुघल सुभेदार सफशिकनखान हा समोर आला नाही, म्हणून शिवाजी महाराज��ी त्याला न भेटता आपल्या मुक्कामाच्या जागी गेले. त्यांच्या मुक्कमाची व्यवस्था मिर्झाराजे जयसिंग यांच्या वाड्यावर करण्यात आली होती. या वाड्यामुळेच तिथल्या वस्तीला जयसिंगपुरा हे नाव पडले. राजे नाराज झालेले पाहून सफशिकनखान भानावर आला आणि तो स्वत:हुन महाराजांच्या भेटीस त्यांच्या डेर्‍यात गेला अन महाराजांचा योग्य तो सन्मान केला.
तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर औरंगाबादहुन निघून शिवाजी महाराज मजल दरमजल करत ११ मे १६६६ रोजी आग्र्याजवळ पोहोचले. मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंग सोहळ्याच्या तयारीत असल्यामुळे त्याने मुनशी गिरिधरलाल यास स्वागताला पाठवले. त्या दिवशी मुकुलचंद सराई येथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. महाराजांना हे खटकले होते, पण त्यांनी तसे दर्शवले नाही.
दुसर्‍या दिवशी १२ मे १६६६ रोजी औरंगजेबाचा वाढदिवस, ज्यासाठी महाराजांना बोलावले होते, त्यासाठी दरबारात जाण्यासाठी मुनशी गिरधरलाल महाराजांना घेवून निघाला. रामसिंग पहार्‍याच्या कामात व्यस्त असल्यामुळे लवकर येवू शकला नाही, पण नंतर तो आला तोवर मार्ग चुकल्यामुळे शिवाजी महाराजांची त्याची भेट हुकली. दुसर्‍या मार्गाने जावून त्याने महाराजांची भेट घेवून आदराने त्यांना दरबाराकडे नेले. यात बराच वेळ गेला. दरबार दहा वाजता भरणार होता, पण मार्गाच्या गोंधळामुळे शिवाजीमहाराज दुपारी तिथे पोहोचले. औरंगजेब सिंहासनावर बसला होता. शिवाजी महाराजांनी रितीप्रमाणे नजराणा पेश केला. औरंगजेब काहीच बोलला नाही. नंतर शिवाजी महाराज व संभाजीस पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. आपला जाणूनबुजून अपमान करण्यात येत आहे हे आग्र्याला पोहोचल्यापासूनच महाराजांच्या लक्षात येत होते. पण दरबारात राजांच्या पुढच्या रांगेत जसवंतसिंगाला पाहून राजाचा संयम तुटला. जसवंतसिंगाने कित्येकदा मराठ्यांना पाठ दाखवून पळ काढला होता, त्याला आपल्यापेक्षा मोठा मान दिलेला पाहुन ते ओरडले ‘जसवंतसिंग जैसे दरबारीसे हमारा दर्जा नीचे? इसका क्या मतलब?’ सारा दरबार आचंबित होवून हे दृश्य पाहू लागला.        
दरबारात मान न राखल्यामुळे अपमानित होवून निघून जाण्याची हिम्मतही दाखवायलाही जिगर लागते. तेही शत्रूच्या गोटात जावून! आपला मान राखला गेला नाही यामुळे राजांना प्रचंड राग आला व ते भर दरबारातून बाहेर पडले. सुडाने पेटून उठलेल्या औरंगजेबाने राजांना नजरकैदेत ठेवले. तीन महिने शिवाजीमहारांच्या निवासासमोर कडक पहारे बसवण्यात आले. पण अतिशय शांत बुद्धीने योजना आखून, बुद्धी चातुर्याने राजे शंभूराजांसह, एवढ्या प्रचंड मुघली पहार्‍यातून १६ ऑगस्ट १६६६ रोजी कैदेतून सहीसलामत निसटले आणि यथावकाश १२ सप्टेंबर १६६६ रोजी रायगडवर सुखरुप परतले. फक्त कल्पना केली तरी हे काम किती अवघड होते हे लक्षात येते, तेही त्या काळात, जेव्हा साधनांची कमतरता होती! वेषांतर करुन, मुघल सैन्याला चकवून, अवघ्या एक महिन्यात आग्र्याहुन ते राजगडावर आले होते! मथुरेला कृष्णाजीपंतांकडे ठेवलेले शंभूराजे २० नोव्हेंबर १६६६ रोजी सुखरुप राजगडावर दाखल झाले.
औरंगजेबाचा विचार शिवाजीमहाराजांना कैदेत असतांनाच संपवायचा होता. पण रामसिंगने वडलांनी दिलेल्या वचनाची आठवण देवून औंरंगजेबास शिवाजीमहाराज निसटुन जाणार नाहीत याची जामिनकी लिहून दिली. या तीन महिन्यात सुटकेसाठी महाराजांनी वेगवगळ्या पद्धतीने प्रयत्न करून पाहिले होते. शेवटी ते आजारी पडले. वैद्य हकीम रोज तपासायला येवू लागले. याच आजारपणाचा वापर करून निसटावे ही योजना महाराजांच्या डोक्यात आली. यातून आपण उठणार नाही असे त्यांनी दर्शवले अन गोरगरीबांना वाटण्यासाठी आपला हस्तस्पर्श केलेल्या मिठायांचे पेटारे पाठवण्याचा बेत आखला. रोज मिठाईचे असंख्य पेटारे येवू लागले. पेटार्‍यांची कडक तपासणी होत होती. पण हे रोजचेच झाल्यामुळे पुढे तपासणीत ढिलाई आली. एक दिवस हिरोजी फर्जंद महाराजांच्या वेशात पलंगावर झोपला. संभाजीस महाराजांनी रामसिंगाकडे पाठवायचे भासवून आधीच बाहेर काढले होते. लहान मुलगा असल्यामुळे त्यास बाहेर जायला परवानगी होती. सर्व ठरल्याप्रमाणे घडत गेले. महाराज पेटार्‍याचे भोई बनून बेमालुमपणे बाहेर पडले. हिरोजी फर्जंद त्याच दिवशी रात्री उशा तक्क्याने पलंगावर महाराजांचा आकार देवून तिथून पसार झाला. सुटका करून घेण्याची ही धाडसी योजना कुणाला काही न कळता आणि कुठलीही जीवितहानी न होता आमलात आली. नंतर खूप हाहा:कार उडाला, खूप शोधाशोध झाली, पण शिवाजी महाराज हाती लागले नाहीत. गळाला लागलेला मासा गळ सोडून निसटून गेला म्हणून औरंगजेब खूपच चरफडला. पण हात चोळत बसण्यापलिकडे तो काहीच करू शकला नाही.
To be cont'd....
© नितीन म. कंधारकर
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
रणझुंझार संताजी बाबा जयंती निमित्त....... छ. संभाजी राजांच्या खुनाचा बदला घेणारे – शूर सेनापती संताजी घोरपडे! मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांची पाशवी हत्या केली व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्च १६८९ ला त्याने रायगडाला वेढा दिला. मराठ्यांनी मध्यरात्री केलेला एक हल्ला मुघलांनी जबरदस्त परतवून लावला. पण राजाराम राजांना सुखरूप गडाबाहेर काढावे असे ठरले व दि ५ एप्रिल १६८९ ला राजाराम राजे रायगडाहून सैन्यासह प्रतापगडी निघाले. स्वराज्याची राजधानी मोगलांच्या हाती पडली, त्याचा फायदा घेणार नाही ते मोगल कसले! दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी झुल्फिकारखानाने रायगडावरील शिवरायांनी तयार केलेलं ३२ मणांचे सिंहासन फोडले व तिथला दफ़्तरखाना जाळला. इतकं करून मोगल थांबले नाही. शंभूराजांची प��्नी येसूबाई, मुलगा शाहू व शिवाजीराजांची पत्नी सकवारबाई यांना कैदेत टाकले…! या सगळ्या गोष्टी मराठा साम्राज्याच्या नीतीधैर्यावर प्रभाव करीत होत्या. त्यांचे नीतीधैर्य वाढावे, मुघलांना एक दणका द्यावा, येसूबाई च्या कैदेचा बदला घ्यावा, शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील म्हाळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्या वेळचे स्वराज्याचे धडाडीचे सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशाह औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला करावा अशी धाडसी योजना आखली. मुघल बादशाह औरंगजेब जर मेला तर सगळंच संपेल ही त्यामागची इच्छा होती. संताजीने छावणी वर हल्ला करावा व त्याच वेळी फलटण, बारामती येथे रणमस्तखान व शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजी जाधव यांनी हल्ला करावा असे ठरवले. संताजीसोबत विठोजी चव्हाण नावाचा शूर मर्दाना व २००० स्वार दिले, सोबत संताजीचे भाऊ बहिर्जी व मालोजी सुद्धा होते. ___या पूर्वी संताजी धनाजी यांना काय म्हणाले याचे वर्णन मल्हार रामराव पुढीलप्रमाणे करतात = पादशाह याची फौज एक दोन मुक्कामावर आली आहे. फलटणच्या आश्रयास आपण लढाई द्यावी, पाठीवर डोंगर असावा, शिवाय माझ्या पथकानिशी तुळापूरमुक्कामी बराबदुद पादशाह यांच्यावर छापा घालतो व मराठे आहो असे खाशास कळवून येतो. चित्रकार - प्रमोद मोती (at महाराष्ट्र माझा)
0 notes